शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

आजारपणाशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान सेलूच्या भूमिपुत्र जवानाने घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 13:01 IST

उपचारादरम्यान सैनिकाने घेतला अखेरचा श्वास; सेलूत शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार

- रेवणअप्पा साळेगावकरसेलू (परभणी ) : सेलू येथील हुसेन नगर येथील रहिवासी असणारे सैन्यदलातील हवालदार शेख गफार शेख संदल( ३९) यांची मुंबई येथे उपचारदरम्यान बुधवारी प्राणज्योत मालवली. सेलू येथील कब्रस्तानात शासकीय इतमामात गुरूवारी रात्री ११:४० वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शेख गफार शेख संदल भारतीय सैन्यदलात हवालदार या पदावर कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांना मुंबईतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारदम्यान बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली.दरम्यान, जवानाच्या निधनाची वार्ता समजताच सेलू शहरात शोककळा पसरली. गुरूवारी रात्री ११:२० वाजता जवान शेख गफार शेख संदल यांचे पार्थिव सेलूत आणण्यात आले. यावेळी शहरातील शेकडो नागरिकांनी अंत्यदर्शन घेतले. २० माजी सैनिकांनी देखील श्रद्धांजली अर्पण केली. 

उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल ओव्हळ तहसीलदार दिनेश झांपले, पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांनी पुष्पचक्र अर्पणकरून श्रद्धांजली वाहिली. पोलीस मुख्यालयातील जवानांनी सलामी दिली. रात्री ११:४० वाजता येथील कब्रस्तानमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानparabhaniपरभणी