शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविकांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर थाळीनाद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 16:01 IST

मागील १६ दिवसांपासून बेमुदत संपावर असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर थाळीनाद आंदोलन करुन शासनाविषयी रोष व्यक्त केला.

परभणी,दि.२६ : मागील १६ दिवसांपासून बेमुदत संपावर असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर थाळीनाद आंदोलन करुन शासनाविषयी रोष व्यक्त केला.

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करावी, यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका १६ दिवसांपासून संपावर गेल्या आहेत. मात्र, शासन जाणीवपूर्वक अंगणवाड्यांची हेळसांड करुन अंगणवाडी कर्मचा-यांना दुय्यम दर्जाची वागणूक देत असल्याचा आरोप थाळीनाद आंदोलना दरम्यान करण्यात आला. अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियन, लालबावटाच्या वतीने दुपारी १२ वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून  जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत थाळीनाद आंदोलन करीत मोर्चा काढण्यात आला. 

यानंतर आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येताच गेटसमोर जोरदार थाळीनाद करून शासनाविषयी रोष व्यक्त करण्यात आला.  आंदोलनात संघटनेच्या अ‍ॅड.माधुरी क्षीरसागर, राजश्री गाडे, अर्चना कुलकर्णी, ताहेरा शेख मस्तान, अनुराधा थोरात, रेखा पानपट्टे, संजीवनी समुद्रे, अरुणा फड, कासाबाई कांबळे, प्रिया सूर्यवंशी, रत्नमाला कदम आदींसह जिल्हाभरातील अंगणवाडी सेविका, अंगणवाडीतील लाभार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.