शासनाच्या तर्कविसंगत कार्यपद्धती व जुनाट कायद्याच्या आधारे प्रशासनाच्या मनमानीविरुद्ध हा काळा दिन पाळत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मंडप लायटिंग, डेकोरेटर्स व साऊंड सर्व्हिस यामध्ये पाच हजारांहून अधिक व्यावसायिकांचा उदरनिर्वाह चालतो. मागील वर्षीपासून आजपर्यंत हा व्यवसाय ठप्प आहे. मध्यंतरी अनलॉक काळात सिनेमागृह, नाट्यगृह या सारख्या व्यवसायांना परवानगी देण्यात आली; परंतु जिल्ह्यातील व संपूर्ण मराठवाड्यात जाचक व विसंगत प्रकारचे निर्बंध मंडप डेकोरेटर्स या व्यवसायावर लादल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. तेव्हा या व्यवसायात लादलेले निर्बंध शिथिल करावेत, अशी मागणी करण्यात आली. याप्रकरणी पालकमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले आहे. त्यावर स.गफार स. चांद, शंकरराव तोडकर, गोविंद अग्रवाल, राजन क्षीरसागर, माणिक कदम, शिवाजी कदम आदींची नावे आहेत.
मंडप व्यावसायिकांनी पाळला काळा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:17 IST