शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

टेनिस बॉल स्पर्धा : परभणीत रंगणार २६ ते २८ जानेवारी दरम्यान सामने;निवड चाचणीत ५० खेळाडूंचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 00:02 IST

परभणी जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने १९ जानेवारी रोजी नूतन विद्यालयाच्या क्रीडांगणावर जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल जिल्हा संघाच्या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते़ या चाचणीत जिल्ह्यातील ५० खेळाडूंनी सहभाग नोंदविला़

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : परभणी जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने १९ जानेवारी रोजी नूतन विद्यालयाच्या क्रीडांगणावर जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल जिल्हा संघाच्या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते़ या चाचणीत जिल्ह्यातील ५० खेळाडूंनी सहभाग नोंदविला़या निवड चाचणीचे उद्घाटन कृउबा सभापती रविंद्र डासाळकर यांच्या हस्ते झाले़ या प्रसंगी माजी आ़ हरिभाऊ लहाने, मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी, अशोक गाजरे, गिरीष लोडया, तुकाराम शेळके, अविनाश शेरे, संतोष शिंदे, सचिन हिरवे, जुलाह खुद्दूस, जिजाभाऊ डख यांची उपस्थिती होती़निवडलेला संघ विसाव्या राज्य मिनी/युथ टेनिस हॉलीबॉल स्पर्धेसाठी परभणी येथील जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयाच्या प्रांगणात २६ ते २८ जानेवारी दरम्यान आयोजित स्पर्धेमध्ये प्रतिनिधीत्व करणार आहे़ गणेश माळवे, संतोष शिंदे यांनी प्रास्ताविक केले़ प्रा़ नागेश कान्हेकर यांनी सूत्रसंचालन केले तर सतीश नावाडे यांनी आभार मानले़४संत जनाबाई महाविद्यालयगंगाखेड- शहरातील श्री संत जनाबाई महाविद्यालयात २६ ते ३० जानेवारी दरम्यान विविध गटात होणाऱ्या कुमार गट कुस्ती स्पर्धेसाठी १९ जानेवारी रोजी निवड चाचणी घेण्यात आली़यामध्ये ४१ ते ९२ किलोग्रॅम वजन गटातील संघात सोपान निवृत्ती सोन्नर, गजानन तेलगड, सागर कदम, शरद सुक्रे, कृष्णा कराड आदी खेळाडूंची निवड करण्यात आली़ यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ़ दयानंद उजळंबे, क्रीडा संचालक डॉ़ चंद्रकांत सातपुते, प्रा़ डॉ़ संजिव कोळपे, प्रा़ डॉ़ सतीश डोंगे, प्रा़ निवृत्ती भेंडेकर, प्रा़ भगवान भोसले, प्रा़ डॉ़ विठ्ठल डुमनर, राष्ट्रीय खेळाडू लक्ष्मण भोसले आदींची उपस्थिती होती़तालुकास्तरीय स्पर्धेत जवाहर विद्यालयाचा डंका४जिंतूर- तालुका संवर्धन मंडळाने आयोजित केलेल्या समूहगीत, समूहनृत्य व कथाकथन स्पर्धेत शहरातील जवाहर विद्यलायाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावून वर्चस्व गाजविले़ या संघाच्या यशाबद्दल प्रशासकीय अधिकारी के़डी़ वटाणे, प्रा़ बळीराम वटाणे, संगीत शिक्षक डी़व्ही़ पांडे, एस़आऱ घुले, एस़एस़ इंगळे, रामकृष्ण दराडे, एम़जी़ मोरे यांनी खेळाडूंचा सत्कार केला़

टॅग्स :parabhaniपरभणीTennisटेनिस