शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

परभणी मनपाने मागविल्या निविदा:दहा लाख रुपयांतून औषधींची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 00:47 IST

शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तात्काळ उपाययोजना करण्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया सुरु केली असून १० लाख रुपयांची विविध औषधी मागविली आहे. ही औषधी उपलब्ध झाल्यानंतर शहरात पुढील तीन वर्षापर्यंतचा औषधसाठा उपलब्ध होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तात्काळ उपाययोजना करण्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया सुरु केली असून १० लाख रुपयांची विविध औषधी मागविली आहे. ही औषधी उपलब्ध झाल्यानंतर शहरात पुढील तीन वर्षापर्यंतचा औषधसाठा उपलब्ध होणार आहे.महापालिकेच्या अंतर्गत कल्याण मंडपम् येथे रुग्णालय असून शहरात वेगवेगळ्या ठिकाणी सहा आरोग्य केंद्र कार्यान्वित आहेत. या आरोग्य केंद्रांमधून सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी या सारख्या किरकोळ आजारांवर उपचार केले जातात. मात्र मागील काही वर्षांपासून पुरेसा औषधसाठा उपलब्ध नसल्याने रुग्णांना उपचार करताना महापालिकेतील आरोग्य कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. सहाही आरोग्य केंद्रांमध्ये येणाºया रुग्णांची संख्या अधिक असून सातत्याने औषधाचा तुटवडा जाणवत असल्याने त्यावर उपाय काढण्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया मागविली आहे.जंत गोळ्या, थंडीताप, जुलाब आदी आजारांवर उपचार करण्यासाठी ३२८ प्रकारची औषधी पुरवठा करण्यासाठी महापालिकेने निविदा मागविल्या आहेत. यात अ‍ॅन्टी बायोटीक, टॅबलेटस्, वेगवेगळ्या प्रकारणी सिरीज आणि सीरप औषधींचा समावेश आहे. महापालिकेने अधिकृत कंपन्यांकडून निविदा प्रक्रिया मागविली आहे. छोट्या आजारांवर तात्काळ उपचार करण्याच्या उद्देशाने मनपाने ही औषधी मागविली असून ती उपलब्ध झाल्यास तीन वर्षाचा औषध साठा मनपाच्या आरोग्य विभागात उपलब्ध होईल. परिणामी रुग्णांची गैरसोय दूर होणार आहे.विविध आजारांची औषधी उपलब्ध४आरोग्य विभागाच्या पाठपुराव्यानंतर मागील आठवड्यात महापालिकेत विविध आजारांची औषधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे औषधींचा तुटवडा दूर झाला आहे. महापौर मीनाताई वरपूडकर, उपमहापौर माजुलाला, सभागृहनेते भगवान वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सभापती सचिन देशमुख यांनी औषधींसाठी पाठपुरावा केला. आरोग्य अधिकारी डॉ.आरती देऊळगावकर यांच्यासह गजानन जाधव, अमोल सोळंके, एस.एस.सॅम्यूलस्, वैजनाथ कदम आदींनी उपलब्ध झालेल्या औषधींची मोजदाद सुरु केली असून हा औषधीसाठा कल्याणनगर येथील मनपाच्या रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.उपलब्ध झालेली औषधी४हापकीन बायोफार्मासिटीकल कंपनीचे सिरप पॅरॉसिटामॉल १५ हजार बॉटल (तापीसाठी), हिंदूस्थान लॅबरोटरिजचे कफ सिरप २३ हजार ५०० बॉटल (खोकला, सर्दीसाठी), हिंदूस्थान लॅबरोटरिजचे मेट्रोनिडयाझोल २५ हजार गोळ्या (जुलाब, पोट दुखीसाठी), हिंदूस्थान लॅबरोटरिजच्या सेप्ट्रॉन गोळ्या ३० हजार (ताप,सर्दी, खोकला, जुलाब आदी आजारांसाठी).मागील दोन वर्षांपासून महापालिकेला औषधींचा तुटवडा जाणवत होता. या प्रश्नावर वारंवार पाठपुरावा केला. त्यामुळे औषधी खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे. निविदा प्रक्रियेतून प्रतिसाद मिळाला नाही तर राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन औषधी खरेदी करण्याची तयारी केली आहे. मागील आठवड्यात काही औषधी उपलब्ध झाली असृून आणखी एक लॉट मिळणार आहे. आरोग्य केंद्रांच्या मागणीप्रमाणे ही औषधी वितरित केली जाईल.-सचिन देशमुख,आरोग्य सभापती, मनपा

टॅग्स :parabhaniपरभणीmedicineऔषधंParbhani Municipal Corporationपरभणी महानगरपालिका