शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत अस्थायी कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 16:23 IST

पोलिसांनी सतर्कतेने त्यास ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला.

परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठातील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास एका अस्थायी कर्मचाऱ्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सतर्कतेने त्यास ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला.

शेख शकील अहमद शेख रहीम असे या कर्मचाऱ्यांचे नाव असून ते पशु वैद्यक महाविद्यालयात अस्थायी स्वरूपात पशू परिचर या पदावर कार्यरत आहेत. पशूवैद्यक व पशू विज्ञान महाविद्यालयाच्या सेवेत कायम आस्थापनेवर सामावून घ्यावे, अशी या कर्मचाऱ्याची मागणी आहे.

शेख शकील अहमद शेख रहीम हे मागील साडेतीन वर्षांपासून सेवेत कायम करावे या मागणीसाठी विद्यापीठाकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र त्यांना केवळ अश्वासानेच मिळत असल्याने ते निराश झाले होते. २० डिसेंबर २०१८ रोजी मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सेवेत सामावून घेण्याचा निर्णय झाला होता; मात्र त्याची अंमलबजावणी होत नव्हती. त्यामुळे शेख शकील यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.

या इशाऱ्यानुसार १ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शेख शकील हे पशू वैद्यक व पशू विज्ञान महाविद्यालयाच्या परिसरात आले. त्यांच्या हातात पेट्रोलची बाटली होती. यावेळी नवा मोंढा पोलीस ठाण्याचे कर्मचारी प्रशांत दीपक, दिनेश चव्हाण आणि रामचंद्र फड यांनी शेख शकील यांना तातडीने ताब्यात घेऊन पेट्रोलची बाटली हस्तगत केली.  या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याparabhaniपरभणीEmployeeकर्मचारी