शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
4
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
5
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
7
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
8
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
9
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
10
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
11
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
12
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
13
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
14
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
15
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
16
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
17
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
18
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
19
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
20
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट

तेलंगणा पोलिसांनी परभणीतून दोन सराफा व्यापा-यांना उचलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 10:45 IST

दरोड्यातील चोरीचे सोने खरेदी केल्यावरुन बुधवारी तेलंगणा पोलिसांनी दोन सराफा व्यापाºयांना उचलले असून हे पोलीस परतीच्या प्रवासाला निघाल्याने व्यापाºयांचे अपहरण झाल्याची चर्चा शहरभर पसरली. दरम्यान, गंगाखेड पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर राणीसावरगाव रस्त्यावर जेसीबी आडवी लावून दोन्ही वाहने थांबविण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : दरोड्यातील चोरीचे सोने खरेदी केल्यावरुन बुधवारी तेलंगणा पोलिसांनी दोन सराफा व्यापाºयांना उचलले असून हे पोलीस परतीच्या प्रवासाला निघाल्याने व्यापाºयांचे अपहरण झाल्याची चर्चा शहरभर पसरली. दरम्यान, गंगाखेड पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर राणीसावरगाव रस्त्यावर जेसीबी आडवी लावून दोन्ही वाहने थांबविण्यात आली.येथील सराफा व्यापारी प्रशांत तापडिया व रवंींद्र उडानशिव यांना २० डिसेंबर रोजी एपी २८/ सीएच ८०९२ आणि डीएल ७/ सीजी ६४९९ या परराज्यातील वाहनात टाकून ही वाहने भरधाव वेगाने शहराबाहेर निघून गेली. या घटनेमुळे काहींनी वाहनांचा पाठलाग केला. तर काही व्यापाºयांनी दोन व्यापाºयांचे अपहरण झाले असून ही वाहने राणीसावरगावकडे गेल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यावरुन पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांनी पिंपळदरी ठाण्याचे सपोनि अरविंद खंदारे यांना माहिती दिली. त्यावरुन राणीसावरगाव चौकीतील एएसआय गुºहाळे यांनी राणीसावरगावात जेसीबी आडवी लावून ही दोन्ही वाहने अडविली. वाहनातील व्यक्तींनी आपण तेलंगणा पोलीस असल्याचे सांगितले. तेवढ्यात या वाहनांचा पाठलाग करीत गंगाखेड पोलीस ठाण्यातील जमादार अण्णा मानेबोईनवाड, भारत तावरे, शेख जिलानी, सुग्रीव कांदे, सतीश दैठणकर हे राणीसावरगाव येथे पोहचले. त्यामुळे हे प्रकरण अपहरणाचे नसून चोरीचे सोने खरेदी करण्याचे असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद न करता दोन सराफा व्यापाºयांना बळजबरीने उचलल्याचा आरोप करीत व्यापाºयांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात ठाण मांडले. त्यामुळे अडविलेली दोन्ही वाहने गंगाखेड पोलीस ठाण्यात आणली. तेलंगणा राज्यातील रंगारेड्डी जिल्ह्यातील चेवला पोलीस ठाण्याअंतर्गत हा दरोडा झाला होता. त्यातील सोने या व्यापाºयांनी खरेदी केल्याचे पकडलेल्या आरोपींनी सांगितले व दुकाने दाखविल्याने व्यापाºयांना ताब्यात घेतल्याचे तेलंगणा पोलिसांनी सांगितले.दरम्यान, व्यापारी, गंगाखेड पोलीस आणि तेलंगणा पोलीस यांच्यात रात्री उशिरापर्यंत चोरीला गेलेले सोने हस्तगस्त करण्याची प्रक्रिया सुरु होती. बंद खोलीत चर्चा झाल्याने नेमके किती सोने चोरट्यांनी या व्यापाºयांना विकले व पोलिसांनी किती सोने हस्तगत केले, याची माहिती मिळू शकली नाही.