शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

शेत आखाड्यावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला, ४० तोळे चांदी लुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2021 13:37 IST

पोलिसांनी पालम परिसरातून एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. 

गंगाखेड ( परभणी ) : गंगाखेड येथून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या चाटोरी रोडलगत असलेल्या शेत आख्याड्यावर गुरुवारी पहाटे १ वाजता दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. चार सशस्त्र दरोडेखोरांनी शेत आखाड्यावर झोपलेल्या अंबादास भिवराजी ठवरे ( ५५ वर्ष रा.आनंदवाडी,  तालुका पालम ) यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. आखाड्यावरील महिलांच्या अंगावरील ४० तोळ्यांचे चादीचे दागीने लुटून दरोडेखोरांनी पलायन केले. 

आनंदवाडी येथिल चाटोरी रोडवर अंबादास भिवाजी ठवरे यांचा आखाडा आहे. बुधवारी रात्री अंबादास, पत्नी पुष्पाबाई आणि नात जान्हवी यांच्यासोबत आखाड्यावर झोपले होते. पहाटे १ वाजता बर्मुडा घातलेले चार दरोडेखोर हातात कुऱ्हाडी घेऊन आखाड्यावर घुसले. दरोडेखोरांनी झोपेत असलेल्या अंबादास ठवरे यांच्यावर कुऱ्हाडीने घाव करत गंभीर जखमी केले. त्यानंतर पुष्पाबाई यांच्या अंगावरील ४० तोळ्याचे चांदीचे दागीने,  सोन्याची पोत व कानातील दागिना असा ७० हजाराचा ऐवज काढून घेत पलायन केले. 

गंभीर जखमी अंबादास यांच्यावर गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले असून अधिक उपचार परभणी येथे सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच पालम पोलीस ठाण्यातील पो.नी.काकडे, पीएसआय विनोद साने, एएसआय राठोड, हे.काॅ.येवते तसेच श्वानपथकाचे एपीआय मोहमद पठाण, पो.काॅ.बबन शिदे घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, पोलिसांनी पालम परिसरातून एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी