शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात १२५ शेतकºयांच्या वर्षभरात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:26 IST

सरत्या वर्षात जिल्ह्यामध्ये १२५ शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या असून त्यापैकी ८५ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना शासनाने तत्काळ मदतीचे धनादेश वितरित केले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सरत्या वर्षात जिल्ह्यामध्ये १२५ शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या असून त्यापैकी ८५ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना शासनाने तत्काळ मदतीचे धनादेश वितरित केले आहेत.सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणा यामुळे जिल्ह्यामध्ये शेतकºयांच्या आत्महत्या होत आहेत. दोन वर्षापूर्वी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले होते. मात्र मागील वर्षी बºयापैकी पाऊस झाला. खरीप आणि रब्बी हंगामात उत्पन्नही मिळाल्याने शेतकºयांच्या आत्महत्या घटतील, अशी अपेक्षा होती. मात्र शेतकºयांच्या पाठीमागील संकटांचे सत्र कमी होत नसल्याचेच दिसून आले. कधी पावसाचा ताण तर कधी शेतमालाला भाव न मिळाल्याने शेतकरी अडचणीत सापडले होते. वर्षाच्या शेवटी शेवटी तर बोंडअळीमुळे सर्वच कापूस उत्पादक शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागला.नैसर्गिक आणि प्रशासकीय अशा दोन्ही बाजुने जिल्ह्यतील बळीराजा त्रस्त झाला होता. त्यामुळे सरत्या वर्षातही शेतकºयांच्या आत्महत्यांचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच गेले. संपूर्ण वर्षभरात १२५ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले आहे. शेतकरी आत्महत्या झाल्यानंतर प्रशासनाच्या वतीने या आत्महत्याप्रकरणात बैठक घेऊन १ लाख रुपयापर्यंतची तातडीची मदत देण्याचा निर्णय घेतला जातो. वर्षभरात झालेल्या १२५ शेतकरी आत्महत्यापैकी ८५ आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना प्रति कुटुंब १ लाख या प्रमाणे ८५ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे.९ प्रकरणे प्रलंबितजिल्ह्यात झालेल्या शेतकरी आत्मत्येच्या प्रकरणांपैकी ९ प्रकरणे अजूनही प्रलंबित आहेत. या प्रकरणांवर प्रशासन लवकरच बैठक घेऊन निर्णय देणार आहे. त्यात डिसेंबर महिन्यात ९ शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या होत्या. त्यापैकी एक शेतकरी आत्महत्या प्रशासनाने अपात्र ठरविली असून उर्वरित ८ प्रकरणे प्रलंबित ठेवले आहेत. तसेच आॅगस्ट महिन्यात १५ शेतकºयांनी आत्महत्या केल्या होत्या. त्यापैकी १२ शेतकरी कुटुंबियांना तातडीने मदत देण्यात आली. दोन प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. तर एक प्रकरण प्रलंबित आहे. त्यामुळे प्रलंबित असलेल्या ९ प्रकरणांवर येत्या दोन दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे.३१ प्रकरणे ठरविली अपात्रशेतकºयांची आत्महत्या झाल्यानंतर जिल्हा प्रशासनातील अधिकारी या शेतकºयांच्या आत्महत्येचा कारणांचा शोध घेतात. कर्जबाजारीपणा, नापिकी या कारणांमुळेच शेतकºयांनी आत्महत्या केली असेल तर त्या शेतकºयाच्या वारसदारास १ लाख रुपयांची तातडीची मदत दिली जाते. जिल्ह्यात १२५ शेतकरी आत्महत्येची प्रकरणे झाली आहेत. त्यापैकी ८५ प्रकरणांमध्ये शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात आली. तर ३१ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत.योजनांचाही शासन देणार लाभ२०१७ या वर्षात आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या वारसांना शासनाने आर्थिक मदत तर दिलीच आहे. शिवाय २०१२ पासून जिल्ह्यामध्ये ४१३ शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांचे सर्व्हेक्षणही प्रशासनाने काही दिवसांपूर्वी केले. या सर्व्हेक्षणात शेतकºयांच्या आत्महत्येनंतरच हे कुटुंब कसे जगत आहे, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना आणखी मदतीची आवश्यकता आहे का? याचा अभ्यास करुन शासकीय योजनांचा लाभ दिला जाणार आहे.मे महिन्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या२०१७ या वर्षात मे महिन्यामध्ये सर्वाधिक १७ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. आॅगस्ट, सप्टेंबर या दोन महिन्यात प्रत्येकी १५, मार्चमध्ये १३, आॅक्टोबर महिन्यात १२, एप्रिल आणि नोव्हेंबर महिन्यात प्रत्येकी ७, फेब्रुवारी महिन्यात ६, जानेवारी महिन्यात ५ तर डिसेंबर महिन्यात ७ शेतकºयांनी कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्या. एका वर्षात आत्महत्याग्रस्त शेतकºयांची संख्या सव्वाशेवर पोहचल्याने शेतकºयांची मन:स्थिती किती नाजुक झाली आहे, याची प्रचिती येते.