शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेत चांगले गुण मिळत नसल्याने नैराश्यात तरुणीने संपवले जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 18:30 IST

दोन दिवसांपासून बेपत्ता तरुणीचा मृतदेह गोदावरी पात्रात आढळला

पाथरी - दोन दिवसांपासून वह्या आणण्यासाठी घरातून मोपेडवर बाहेर पडलेली तरुणी बेपत्ता होती. गुरुवारी ( दि. 18 ) सकाळी 9 वाजेच्या सुमारास तिचा गोदावरी पात्रातील ढालेगाव बंधाऱ्याच्या परिसरात मृतदेह आढळून आला आहे. संपदा घुले ( २०) असे मृत तरुणीचे नाव असून परीक्षेत चांगले गुण मिळत नसल्याने नैराश्यातून तिने आत्महत्या केली असल्याची माहिती आहे. 

पाथरी शहरातील शाहू नगर येथील सुभाष घुले यांची मुलगी संपदा 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता वह्या आणण्यासाठी म्हणून घरून मोपेड घेऊन गेली होती. बराच वेळ झाल्यानंतरही ती घरी परतली नाही. तसेच तिचा मोबाईल फोनवर संपर्क होत नसल्याने वडिलांनी शोधशोध सुरू केली. काही वेळाने ढालेगावच्या पुलाजवळ संपदाची मोपेड, चपल आणि स्कार्फ आढळून आला. मात्र, मुलगी आढळून आली नाही. यामुळे पाथरी पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने गोदावरी पात्रात दोन दिवस शोध घेतला. गुरुवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास तिचा मृतदेह गोदावरी पात्रात तरंगताना आढळून आला. या प्रकरणी मुलीचे काका गोविंद घुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आकस्मित मृत्यूची पाथरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

परीक्षेत चांगले गुण मिळत नसल्याने होती नैराश्यात बारावीनंतरच्या सीईटी परीक्षेत चांगले गुण मिळत नसल्याने संपदा नैराश्यात होती. यातूनच तिने आत्महत्या केली. मुलीच्या काकाने दिलेल्या फिर्यादीत हा उल्लेख करण्यात आला आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याparabhaniपरभणीStudentविद्यार्थी