शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

धर्मापुरी येथील युवकाची गंगाखेडच्या लॉजमध्ये आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 19:05 IST

बस स्थानकाजवळील एका लॉजमध्ये धर्मापुरी येथील युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

गंगाखेड (परभणी ) : येथील बस स्थानकाजवळील एका लॉजमध्ये धर्मापुरी येथील युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास उघडकीस आली. संतोष नामदेव हाके (२३ ) असे मृताचे नाव आहे. 

मंगळवारी रात्री ९ वाजेच्या दरम्यान बस स्थानकासमोरील एका लॉजमध्ये संतोष हाके (रा. हाके गल्ली धर्मापुरी ता. परळी जि. बीड)  याने रूम घेतली. आज सकाळी रूमची सफाई करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याने संतोष याच्या रूमचे दार वाजवले मात्र त्याने दार उघडले नाही. यानंतर सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत त्याने दरवाजा उघडला नाही. यामुळे लॉज मालक हिरा मेहता यांनी १२ वाजेच्या सुमारास याची माहिती गंगाखेड पोलीस ठाण्यात दिली. 

पोउपनि भाऊसाहेब मगरे, रवि मुंडे, जमादार सुलक्षण शिंदे, पोशि माणिक वाघ, योगेश गयाळ, सुग्रीव कांदे, शेख जिलानी, विष्णु वाघ आदी पोलीस कर्मचारी लॉज वर पोहचले. रूम मधून प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांनी संतोषचा भाऊ दिपक हाके यांच्याशी संपर्ककरून त्यांना लॉजवर बोलवून घेतले. यानंतर दीपक हाके यांच्या समोर रूमचा दरवाजा तोडण्यात आला. यावेळी संतोषने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. या प्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास जमादार सुलक्षण शिंदे करत आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्याParbhani policeपरभणी पोलीस