शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अचानक वीज खंडित केल्याने एकाच दिवसात २०० विद्युत मोटारी जळाल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 12:17 IST

कोणतीही सूचना न देता वीजपुरवठा खंडीत केला जात असल्याने विद्युत मोटारी जळत आहेत़ तालुक्यातील जवळपास २०० मोटारी आतापर्यंत जळाल्या आहेत़ 

ठळक मुद्देमहावितरणच्या  वतीने शेतक-यांकडून वीज बिल थकबाकी वसूल करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे़ तालुक्यात आतापर्यंत जवळपास २०० विद्युत मोटारी जळाल्या आहेत.

जिंतूर (परभणी) : महावितरणच्या वतीने जिंतूर तालुक्यात वीज वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे. यात कोणतीही सूचना न देता वीजपुरवठा खंडीत केला जात असल्याने विद्युत मोटारी जळत आहेत़ तालुक्यातील जवळपास २०० मोटारी आतापर्यंत जळाल्या आहेत़ 

महावितरणच्या  वतीने शेतक-यांकडून वीज बिल थकबाकी वसूल करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे़ येलदरी ३३ केव्ही अंतर्गत २२ गावे येतात़ आठ दिवसांपासून ही मोहीम सुरू आहे़ ज्या शेतक-यांनी वीज बिल भरले नाही, अशा शेतक-यांची वीज जोडणी तोडली जात आहे़ येलदरी, सावळी, केहाळ, घडोळी, चिंचखेडा, आमदरी, खोलगाडगा, मुरूमखेडा, हिवरखेडा, गणेशनगर, साईनगर तांडा, इटोली, ब्रह्मवाडी, तांदूळवाडी, लिंबाळा येथील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे़ वीजपुरवठा खंडित करताना शेतक-यांना कोणतीही सूचना दिली जात नाही़ शेतक-यांचे विद्युतपंप आॅटोमॅटिक आहेत़ त्यामुळे वीज बिल भरणा केल्यानंतर विद्युत जोडणी करताना दोन फेज  टाकले जात आहेत़ त्यामुळे आॅटोमॅटिक विद्युत मोटारी जळत आहेत़ तालुक्यात आतापर्यंत जवळपास २०० विद्युत मोटारी जळाल्या आहेत. विद्युत मोटार दुरुस्तीसाठी एका शेतक-याला ४ ते ५ हजार रुपयांचा खर्च येत आहे़ यामुळे शेतक-यांचे आतापर्यंत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे़ 

१ कोटी ७० लाखांची थकबाकी येलदरी ३३ केव्ही केंद्राअंतर्गत केवळ १३१ कृषी पंपधारक असल्याची नोंद महावितरणकडे आहे़ प्रत्यक्षात हा आकाडा हजारांच्या घरात आहे़ ३३ केव्ही केंद्राअंतर्गत किती विद्युत रोहित्र आहेत? याची माहिती महावितरणकडे नाही़ शेतक-यांकडे १ कोटी ७० लाखांची थकबाकी दाखविली आहे़ परंतु, या केंद्रामध्ये दोन वर्षांपासून केवळ एकच आॅपरेटर आहे. त्यामुळे दुरुस्ती देखभालीचे काम करण्यासाठी कर्मचा-यांची कमतरता आहे़ विजेचा दाब नेहमी कमी जास्त होत असल्याने त्याचा फटका शेतक-यांना बसत आहे़ 

रबी हंगामाची चिंतासध्या रबी हंगामासाठी शेतकरी मशागत करीत आहेत़ काही प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने पाणी देण्याचे नियोजन केले आहे. परंतु, महावितरणच्या कारवाईमुळे रबी हंगामाला मुकावे लागते की काय? याची चिंता शेतक-यांना लागली आहे. येलदरी येथील ३३ केव्ही केंद्राअंतर्गत कृषीपंप जळाल्याबाबत आपण चौकशी करून कार्यवाही करू.- डब्ल्यू़ यू़ नगराळे, कार्यकारी अभियंता, विभाग-२

नुकसान भरपाई द्यावी़महावितरणने वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे़ कोणतीही पूर्व सूचना दिली नसल्याने शेतक-यांचे कृषीपंप जळाले आहेत़ या सर्व प्रकाराला महावितरण जबाबदार आहे. योग्य ती कारवाई करून शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी़- सुंदरराव चव्हाण, माजी सभापती

कारवाई करावी.महावितरणच्या बेजबाबदार कारभारामुळे २०० ते ३०० मोटारी जळाल्या आहेत़ याची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी.- भगवानराव म्हाळणकर, शेतकरी हिवरखेडा