शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत शिवजन्मोत्सवाची जिल्हाभरात जोरदार तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 00:11 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी जिल्हाभरात साजरी केली जाणार असून, यासाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे़ परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तर शहरात ठिकठिकाणी कमानी उभारण्यात आल्या आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी जिल्हाभरात साजरी केली जाणार असून, यासाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे़ परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तर शहरात ठिकठिकाणी कमानी उभारण्यात आल्या आहेत़परभणी शहरात शिवप्रेमींच्या वतीने सार्वजनिक शिवजन्मोत्सव साजरा केला जाणार आहे़ यानिमित्त मंगळवारी दुपारी ३ वाजता शहरातील प्रमुख मार्गावरून छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची मिरवणूक काढली जाणार आहे़ शनिवार बाजार, शिवाजी चौक, गांधी पार्क, विसावा कॉर्नरमार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत ही मिरवणूक काढण्यात येईल़ हत्ती, लेझीम पथक, वारकरी, वासुदेव पथक, ढोल, झांज पथक, बँड पथक, गोंधळी पथक, घोडे, उंट, महिला तलवारबाजी व हत्तीवरील अंबारीत छत्रपती शिवरायांची मूर्ती असे या मिरवणुकीचे आकर्षण राहणार आहे़ नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने जयंती उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे़ तसेच वारकरी मंडळाच्या वतीने वारकरी दिंडी काढली जाणार आहे़ शहरातील विविध भागांमध्ये जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे़ प्रबोधनात्मक कार्यक्रम, पोवाडे, गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार, व्याख्यान आदी उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे़दरम्यान, सोमवारीच परभणी शहरात शिवजयंती उत्सवाची तयारी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरासह प्रमुख रस्त्यांवर भगवे ध्वज, पताका लावण्यात आल्या आहेत़ जयंतीच्या पार्श्वभूमीवर विविध साहित्य विक्रीसाठी दाखल झाले आहे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमा, मूर्ती बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत़ तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात भव्य अशा एलईडी दिव्यांची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज