येथील बी. घुनाथ सभागृहात २६ जून रोजी छत्रपती शाहू महाराज सार्वजनिक जयंती समितीच्या वतीने आयोजित अभिवादन सोहळ्याप्रसंगी मुगळीकर बोलत होते. अध्यक्षस्थानी आयोजक विजय वाकोडे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून महापौर अनिता सोनकांबळे, सहायक पोलीस अधीक्षक अविनाशकुमार, उपमहापौर भगवान वाघमारे, शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, पोलीस निरीक्षक कुदनकुमार वाघमारे, रिपाइंचे राज्यसचिव डी.एन. दाभाडे, पीआरपीचे गौतम मुंढे, माजी सभापती रवी सोनकांबळे, नगरसेवक सुशील कांबळे, सुधीर साळवे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आरक्षणाचे सूत्र देशाला प्रदान करून समता युगाचा ध्यास घेणाऱ्या शाहू महाराज यांचे विचार सर्व जनतेने अंगीकारावेत, असे आवाहन निमंत्रक विजय वाकोडे यांनी यावेळी केले. कार्यक्रमात डॉ. राहुल रणवीर, डॉ. संदीप धबवाले, डॉ. माधुरी लोखंडे, मनपाचे मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, चंदाराणी लेमाडे त्याचप्रमाणे किरण मानवतकर, कैलास गायकवाड, डॉ. विजय सावंत, बाबुराव केळकर, किशोर रन्हेर, डॉ. अशोक जोंधळे, मधुकर कांबळे आदींचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. मुख्य समन्वयक यशवंत मकरंद यांनी प्रास्ताविक केले. कार्यवाहक राहुल वहीवाळ यांनी सूत्रसंचालन केले. यशस्वीतेसाठी चंद्रकांत लहाने, संजय अडागळे, सोहम खिल्लारे, शुभम मस्के, सुधाकर वाघमारे, सिद्धार्थ कसारे, दिलीप साळवे, संजय टेकुळे, अनिल डहाळे, द्वारकाबाई गंडले, हर्षराज खिल्लारे, राहुल घनसावंत, सुशील शिंदे आदींनी प्रयत्न केले.