शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मानवतच्या शासकीय गोदामातून साखरेची १४ पोती चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 16:55 IST

शहरातील शासकीय गोदामातील साखरेचे पन्नास किलोचे १४ पोती चोरीस गेल्याची घटना शुक्रवारी (दि.२ ) उघडकीस आली.

मानवत (परभणी ) : शहरातील शासकीय गोदामातील साखरेचे पन्नास किलोचे १४ पोती चोरीस गेल्याची घटना शुक्रवारी (दि.२ ) उघडकीस आली. धक्कादायक बाब म्हणजे लाखो रुपयाचे स्वस्त धान्य ठेवण्यात येत असलेल्या या गोदामास साधी सुरक्षा भिंत नसून अद्याप वीजसुद्धा उपलब्ध नाही.

आठवडे बाजार येथे असलेल्या शासकीय गोदाम परिसरातील  दक्षिण बाजुस असलेल्या गोदामात साखरेची ६० पोते ठेवण्यात आली होती. गुरुवारी (दि. १) नायब तहसीलदार शेख वसिम, गोदामपाल राजेश अवचार यांनी गोदामातील मालाची  नोंद घेऊन गोदाम कुलुपबंद केले होते. शुक्रवारी (दि. २) येथे नियुक्त असलेले वॉचमन हमीद यांना सकाळी ८ च्या दरम्यान गोदामात चोरी झाल्याचे लक्षात आले. यावरून त्यांनी चोरीची माहिती गोदामपाल अवचार यांना दिली. 

यानंतर प्रभारी तहसीलदार नकुल वाघुंडे, पुरवठा अधिकारी शेख वसीम यांनी गोदामाकडे धाव घेतली. यावेळी गोदामात ठेवलेल्या साखरेच्या ५० किलोच्या पोत्यांचे मोजमाप केले असता त्यातील १४ पोती कमी आढळून आली. त्याची बाजारातील किंमत १३ हजार ५०० रुपये एवढी आहे. यावरून गोदामपाल अवचार यांच्या तक्रारीवरुन चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास बीटजमादार साळवणे करीत आहेत.

विजेविना होते गोदामाची सुरक्षास्वस्त धान्य दुकानासाठीचे लाखो रुपयाचे धान्य व इतर माल या शासकीय गोदामात ठेवण्यात येतो. मात्र येथे गोदामाच्या सुरक्षेची कसलीही काळजी घेण्यात येत नाही. सीसीटीव्ही सोडाच पण येथे  अद्याप वीज सुद्धा उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. या बाबतीत प्रभारी तहसीलदार वाघुंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विज व सुरक्षा भिंत यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे सांगितले. दरम्यान गोदामाच्या भिंतीस असलेली एक खुली खिडकी आज बुजविण्यात आली आहे.

टॅग्स :theftचोरीparabhaniपरभणी