शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यातील सेलू येथील स्थिती :प्रभारी अधिकाऱ्यांवर कार्यालयांचा पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:15 IST

सेलू येथील प्रमुख शासकीय कार्यालयांचा रिक्त पदाचा पदभार प्रभारींवर सोपविण्यात आला आहे. त्यामुळे ठोस निर्णय घेताना अडचणी निर्माण होत असून याचा परिणाम कामकाजावर होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : येथील प्रमुख शासकीय कार्यालयांचा रिक्त पदाचा पदभार प्रभारींवर सोपविण्यात आला आहे. त्यामुळे ठोस निर्णय घेताना अडचणी निर्माण होत असून याचा परिणाम कामकाजावर होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना गावापर्यंत पोहोचविण्यासाठी पंचायत समिती कार्यालयावर मोठी जबाबदारी आहे. परंतु, येथील गटविकास अधिकारी चंद्रमुनी मोडक यांची २६ जुलै २०१७ रोजी बदली झाली. त्यानंतर डी.एस. आहिरे यांच्याकडे गटविकास अधिकारीपदाचा प्रभारी पदभार सोपविण्यात आला. मे महिन्यात पी.बी. काकडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र काकडे अद्यापही रुजू झाले नाहीत. त्यामुळे अनेक विकासकामे खोळंबली आहेत.कृषी विभागातील तालुका कृषी अधिकारी पदाचा पदभार अडीच वर्षापासून प्रभारी अधिकाºयांकडे सोपविण्यात आला आहे. अडीच वर्षापूर्वी तालुका कृषी अधिकारी राम रोडगे यांची जालना येथे बदली झाल्यानंतर परभणीचे मिलींद बीडबाग यांच्याकडे दोन वर्ष पदभार होता.जानेवारी महिन्यांपासून मंडळ कृषी अधिकारी आर.जी. मगर यांच्याकडे तालुका कृषी अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.त्याचप्रमाणे सहकार विभागातील सहाय्यक निबंधक दिलीप गौंडर यांची मे महिन्यात बदली झाली आहे. त्यांचा पदभार इतर अधिकाºयांकडे सोपविला आहे.उपजिल्हा रुग्णालयालाही रिक्त पदांची समस्या सतावत आहे. येथील वैैैद्यकीय अधीक्षकपद एक वर्षांपासून रिक्त असून, वैद्यकीय अधिकारी संजय हरबडे यांच्याकडे या पदाचा पदभार आहे. हरबडे यांनी या पदाला न्याय दिला असला तरी इतर वैद्यकीय अधिकाºयांची रिक्त पदे रिक्त असल्याने येथील रुग्णसेवेवर परिणाम होते.एकंदर तालुक्यातील महत्त्वाच्या कार्यालयात प्रभारीराज असल्याने विकासाच्या कामांवर परिणाम होत आहे. प्रभारी अधिकारी निर्णय घेण्यास विलंब करतात. त्यामुळे नागरिकांना एकाच कामांसाठी खेटा माराव्या लागतात.अधिकाºयांची नकारघंटाशैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक शहर म्हणून ओळख असलेल्या सेलू शहरामध्ये येण्यासाठी पूर्वी अधिकारी उत्सुक असत. परंतु, काही वर्षांपासून लोकप्रतिनिधी व पदाधिकाºयांचा आक्रमक पवित्रा आणि कोणत्याही मुद्यावर टोकाचा संघर्ष होत आहे. त्यामुळे यामध्ये आपण भरडले जातोत की काय, या शक्यतेने नवीन अधिकारी सेलू येथे येण्यास उत्सुकता दाखवित नाहीत. परिणामी येथील महत्त्वाची पदे वर्षानुवर्षे रिक्त राहत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीParbhani z pपरभणी जिल्हा परिषदState Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकार