शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी शहरातील स्थिती :महसूल विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमणाकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 00:27 IST

शहरातील महसूल विभागाच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात खाजगी व्यक्तींनी अतिक्रमण केले असताना ही अतिक्रमणे हटविण्याकडे या विभागाच्या अधिकाºयांना वेळ मिळत नसल्याने शासकीय जमिनी धोक्यात आल्या आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील महसूल विभागाच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात खाजगी व्यक्तींनी अतिक्रमण केले असताना ही अतिक्रमणे हटविण्याकडे या विभागाच्या अधिकाºयांना वेळ मिळत नसल्याने शासकीय जमिनी धोक्यात आल्या आहेत़शहरात विविध ठिकाणी महसूल विभागाच्या मालकीच्या जमिनी आहेत़ विशेषत: प्रशासकीय इमारतीच्या परिसरातील जमिनीवर दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत आहे़ चार वर्षापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी एस़पी़ सिंह यांनी या परिसरातील अतिक्रमणे हटवून महसूलच्या जमिनी ताब्यात घेतल्या होत्या़ सिंह यांची बदली झाल्यानंतर या जमिनीकडे एकाही महसूल विभागाच्या अधिकाºयांचे लक्ष गेले नाही़ परिणामी आता या परिसरातील जमिनींवर पक्के बांधकाम करून अतिक्रमण करण्यात आले आहे़ शिवाय मोकळ्या जागेवरही अतिक्रमण झाले आहे़या संदर्भात जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांच्याकडे तक्रारीही करण्यात आल्या होत्या़ त्यावेळी शिव शंकर यांनी परभणीचे तहसीलदार विद्याचरण कडवकर यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते; परंतु, कडवकर यांना या प्रकरणी कारवाई करण्यास वेळच मिळालेला नाही़ परिणामी या भागातील जमिनींवर दिवसेंदिवस अतिक्रमण वाढू लागले आहे़शासकीय दस्ताऐवजात फेरबदलाचा प्रयत्नआज घडीला महसूल विभागाच्या जमिनी या मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे या जमिनीची बाजारभावाप्रमाणे कोट्यवधी रुपयांची किंमत आहे़ त्यामुळे या जमिनीवर अनेकांचा डोळा आहे़ त्यामुळेच काहींना हाताशी धरून शासकीय दस्ताऐवजांमध्ये फेरबदल करण्याचा प्रयत्नही सुरू असल्याची चर्चा शहरात होताना दिसून येत आहे़ त्यामुळे या शासकीय जमिनीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे़ त्यामुळे जिल्हाधिकाºयांना या प्रकरणी वैयक्तीक लक्ष घालून कारवाई करावी लागणार आहे़ अन्यथा शहरातील इतर ठिकाणच्या मनपाच्या जमिनीवर ज्या प्रकारे कब्जा करण्यात आला, तसाच काहीसा प्रकार महसूलच्या जमिनीबाबतही होण्याची शक्यता आहे़वक्फ बोर्डाच्या जमिनीवरही अतिक्रमणशहरात वक्फ बोर्डाची मोठ्या प्रमाणात जमीन आहे़ या जमिनीवरही सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे़ वक्फ बोर्डाच्या औरंगाबाद येथील कार्यालयास या जमिनीकडे पाहण्यास वेळ मिळत नाही़ चार वर्षापूर्वी वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली होती़ परंतु, नंतर ही मोहीम बारगळली़

टॅग्स :parabhaniपरभणीEnchroachmentअतिक्रमण