संत रविदास यांची जयंती साजरी
परभणी : येथील राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्यावतीने शहरातील खानापूर येथील अनुसया नगरमध्ये संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष माधवराव गायकवाड, प्रा. रत्नाकर कांबळे, परमेश्वर जवादे, प्रा. अविनाश जाधव, सुखदेव धोंगडे, प्रकाश गोरे, महादू शिंदे, सुरेश ठोंबरे, बाळासाहेब आस्वार, भानुदास गोरे आदींची उपस्थिती होती.
वाळू मोफत देण्याची मागणी
परभणी : रमाई घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना जप्त करण्यात आलेली वाळू तत्काळ मोफत देण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने ५ मार्च रोजी एका निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. निवेदनावर भगवान कांबळे, शेख सरफराज, सतीश दामोधरे, वाजेद पठाण, परसराम शिंदे, विशाल रणखांबे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
जयंती समितीच्या अध्यक्षपदी जगताप
परभणी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती उत्सव समिती सुजाता कॉलनीच्या अध्यक्षपदी भगवानराव जगताप यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी गौतम साळवे, कोषाध्यक्ष नामदेव गायकवाड, सचिव प्रवीण वाघमारे, सहसचिव अशोक जोंधळे, युवक प्रतिनिधी शुभम तालेवार, अक्षय जगताप, सचिन गायकवाड, सचिन मुंडे, हर्षवर्धन बुक्तर, सचिन प्रदान आदींच्या निवडी करण्यात आल्या.
वयाेश्रेष्ठ पुरस्कारासाठी आवाहन
परभणी : केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांना वयोश्रेष्ठ सन्मान पुरस्कार देण्यात येतो. त्यामुळे १ ऑक्टोबर रोजी साजऱ्या होणाऱ्या एकात्मिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त वयोवृद्धासाठी काम करणाऱ्या व्यक्ती, संस्थांना विविध प्रवर्गातील वयोश्रेष्ठ सन्मान पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यासाठी १० मार्चपर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन कवले यांनी केले आहे.
एमपीएससीमार्फत परीक्षा घ्या
परभणी : २८ फेब्रुवारी रोजी झालेली आरोग्य विभागाची परीक्षा रद्द करून ही परीक्षा एमपीएससीमार्फत घेण्यात यावी, अशी मागणी एस.जे.ए. संघटनेच्यावतीने ३ मार्च रोजी एका निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. निवेदनावर रविकांत गवते, उमेश ओहळ, अमोल गाडेकर, प्रतीक गायकवाड, देवेंद्र दातार, रामा जोंधळे, सतीश महामुने, अतुल वैराट, श्याम खिस्ते आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.