शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

जिंतूरजवळ पुलावरून बस कोसळली, ४२ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2024 10:08 IST

जखमींना पुढील उपचारासाठी परभणी येथे जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

जिंतूर: जिंतूर-सोलापूर बस आज सकाळी सव्वा आठच्या सुमारास अकोली गावाजवळील पुलावरून खाली कोसळली. यात बसमधील ४२ प्रवासी जखमी झाले. तर यापैकी दहा ते बारा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. 

जिंतूर आगारातून जिंतूर-सोलापूर ही बस ( क्रमांक एमएच १४ बीटी २१७०) सकाळी आठ वाजेच्या सुमारास निघाली. शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर जाताच अकोली पुलाजवळील वळणावर बस पुलावरून खाली कोसळली. बस कोसळण्याचा आवाजाने आजूबाजूच्या हॉटेलमधील कामगार, शेतकरी, वाहनधारकांनी तात्काळ जखमींना बाहेर काढले. तर सामाजिक कार्यकर्ते नागेश आकात यांच्यासह इतरांनी रुग्णवाहिकेतून जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जवळपास २५ जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

अपघात एवढा भीषण होता की गाडीचे इंजन बाजूला जाऊन पडले. तर गाडीचे टायर वेगवेगळ्या ठिकाणी विखुरले होते. पुलाचा डाव्या बाजूचा कठडा पूर्णपणे उध्वस्त झाला. माहिती मिळताच पोलीस,आरोग्य विभागाचे कर्मचारी, सामाजिक कार्यकर्त्यांनी अपघातस्थळी धाव घेतली.

अपघाताचे कारण गुलदस्त्यातअपघात झाल्यानंतर एसटी बसचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. त्याने अपघात होत असताना बसमधून उडी मारली असावी असा अंदाज आहे. प्रत्यक्षदर्शीच्या मते चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा. यामुळे नेमका अपघात कशामुळे हे आता चालकच सांगू शकेल.

जखमी प्रवाशांची नावे अशी :मनकर्णा भराडे, संगीता शिवाजी कांगणे, कदिर खान बक्तरी खान, ज्ञानेश्वर मोहिते, निलाबाई इप्पर, निकिता मस्के, साफीया मोहम्मद फुरखान, शेख मेहराज शेख नसीर, शरद पाटील, नितेश देशमुख ,सदाशिव डोईफोडे ,नामदेव पुंड ,रंजना जाधव ,शेख गफार शेख सत्तार ,काशीबाई बन्सी रोकडे, धनश्री दत्तात्रेय रोकडे, अब्दुल अजीज,अ. रजाक, सय्यद काशीद, सत्यभामा संतोष मोहारे, पूजा संतोष मोहारे ,यमुना रोहिदास मस्के, समर्थ राजकुमार भांबळे, राजकुमार संभाजी भांबळे ,पल्लवी राजकुमार भांबळे ,विष्णू शिवाजी भांबळे, सुनीता विष्णू भांबळे ,रुद्र राजकुमार भांबळे ,ज्ञानेश्वर रमेश धर्मे ,जगदीश रमेश धर्मे ,सविता रमेश धर्मे, रमेश हरिभाऊ धर्मे ,छाया राजेश डहाळे ,गीता गजानन डहाळे, प्रियंका राजेश डहाळे ,प्रभाकर विश्वनाथ सानप, मंदाकिनी प्रभाकर सानप, निर्मला नारायण सानप ,नारायण विश्वनाथ सानप ,यांचा जखमीमध्ये समावेश आहे.

टॅग्स :Accidentअपघातparabhaniपरभणी