शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
3
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूर स्थगित केलंय, थांबवलेलं नाही; मोदींचा पाकिस्तानला इशारा
4
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
5
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
6
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
8
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
9
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
10
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
11
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
12
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
13
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
14
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
15
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
16
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
17
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
18
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
19
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
20
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती

धक्कादायक ! तान्ह्या बाळास नेणारी रुग्णवाहिका रिकाम्या ऑक्सिजन सिलिंडरमुळे अर्ध्या रस्त्यातून परतली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 12:38 IST

कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला.

ठळक मुद्दे रुग्णवाहिकेच्या सहाय्याने या बाळाला परभणी येथे आणले जात होते. ग्रामस्थांनी स्वत: रुग्णालयातील स्टोअर रुममधून ऑक्सिजन सिलिंडर रुग्णवाहिकेत टाकले

बोरी (जि.परभणी) : अत्यवस्थ रुग्णाला परभणी येथे उपचारासाठी नेत असताना रुग्णवाहिकेतील ऑक्सिजनचे सिलिंडर रिकामे असल्याची बाब लक्षात आल्यानंतर अर्ध्या रस्त्यातून रुग्णवाहिका परत दवाखान्यात आणण्यात आली. ३० जून रोजी हा प्रकार  घडला. 

बोरी येथील पूनम अशोक वाघमारे या महिलेला २९ जून रोजी रात्री १० वाजता प्रसुतीसाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. ३० जून रोजी या महिलेची प्रसुती झाली. मात्र जन्मलेल्या बाळाची प्रकृती गंभीर असल्याने बोरी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या बाळास परभणी येथे हलविण्याचा सल्ला दिला. त्यामुळे रुग्णवाहिकेच्या सहाय्याने या बाळाला परभणी येथे आणले जात होते. ही रुग्णवाहिका अर्ध्या वाटेत आल्यानंतर रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलिंडर संपल्याची बाब नातेवाईकांच्या निदर्शनास आली. त्यामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. या  प्रकारानंतर रुग्णवाहिका थेट माघारी फिरवत बोरी ग्रामीण रुग्णालयात आणली. ग्रामस्थांनी स्वत: रुग्णालयातील स्टोअर रुममधून ऑक्सिजन सिलिंडर रुग्णवाहिकेत टाकले आणि त्यानंतर या रुग्णवाहिकेचा परभणीच्या दिशेने प्रवास सुरु झाला. 

बोरी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडरचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. मात्र कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे हा प्रकार घडला. त्यामुळे ग्रामस्थांनी दवाखान्यात गर्दी केली होती. जि.प.तील राकाँचे गटनेते अजय चौधरी यांनी औषधी साठ्यांची तपासणी केली असता नुकतेच दोन ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध झाल्याची माहिती मिळाली. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलparabhaniपरभणीdoctorडॉक्टर