शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पर्समध्ये पैसे ठेवताना धक्का मारला, भर बँकेतून दोन महिलांनी पळवली हजारोंची रक्कम

By ज्ञानेश्वर भाले | Updated: October 10, 2023 17:27 IST

गुन्हेगारी प्रवृत्तीला पोलिसांकडून कधी लगाम बसणार? असा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

- रेवणअप्पा साळेगावकरसेलू (जि.परभणी) : शहरातील भारतीय स्टेट बँकेतून १६ हजार रुपये उचलून ते पर्समध्ये ठेवत असताना दोन महिलांनी फिर्यादीस धक्का देत तिच्याजवळील पर्समधून रक्कम हिसकावून नेल्याची घटना पुढे आली. याप्रकरणी रात्री उशिरा सेलू ठाण्यात दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

उर्मिला भीमा भवाळ (५०, रा. रायपूर) यांनी फिर्याद दिली की, सोमवारी दुपारी शहरातील एसबीआय शाखेतून १६ हजार काढून पर्समध्ये ठेवले. दरम्यान, पांढरा, राखाडी रंगाचे पंजाबी ड्रेस घातलेल्या दोन अनोळखी महिलांनी उर्मिला भवाळ यांना धक्का देत पर्समधील १६ हजार रुपये चोरून नेले. फिर्यादीने आरडाओरडा करेपर्यंत महिलांनी पोबारा केला. विशेष: हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. दुसरीकडं बँकेत सुरक्षारक्षक असताना अशी घटना घडल्याने याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पंचनामा केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार तेलंगे तपास करीत आहेत.

अडीच महिन्यांत दुसरी घटना२७ जुलै सेलू शहरातील एका खासगी बँकेतून दुपारी साडेतीनच्या दरम्यान दीड लाख रोख काढून बाहेर येताना पोलिस कर्मचाऱ्यास दुचाकीवरील दोन चोरट्यांनी लुटून दीड लाखाची बॅग घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. विशेषतः हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या घटनेचा तपास पोलिसांना घेता आला नाही. तोच शहरात पुन्हा सोमवारी भरदिवसा असाच दुसरा प्रकार घडला. त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य खराब करण्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला पोलिसांकडून कधी लगाम बसणार? असा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी