शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
4
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
5
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
6
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
7
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
8
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
9
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
10
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
11
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
12
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
13
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
14
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
15
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
16
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
17
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
18
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
19
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
20
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

'ती' बुद्ध नव्हे सिद्धमूर्ती; तलावातील गाळात सापडलेल्या अवशेषांबद्दल अभ्यासकांचा दावा

By ज्ञानेश्वर भाले | Updated: June 22, 2023 11:20 IST

भगवान गौतम बुद्धांचीही अशा प्रकारची मूर्ती कुठे दिसत नाही. त्यामुळे हे शिल्प नाथ संप्रदायातील सिद्ध शिल्प असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

जिंतूर (जि.परभणी) : तालुक्यातील मानकेश्वर येथे खोदकाम करीत असताना सापडलेले शिल्प हे बुद्धमूर्ती नसून सिद्धमूर्ती असल्याची शक्यता असून, इतिहास संशोधक येत्या दोन दिवसांत त्या ठिकाणी भेट देणार आहेत. तालुक्यातील मानकेश्वरमध्ये १८ जूनला पाझर तलावातील गाळ काढत असताना प्राचीन मूर्ती व कोरीव खांब आढळून आले असून, शास्त्रीय पद्धतीने उत्खनन केले जाणार आहे.

प्रथमदर्शनी ही बुद्धमूर्ती असावी असे भासत होते. परंतु, नाथ संप्रदायातील ती सिद्धमूर्ती असावी, असे बोलले जात आहे. विशेष म्हणजे सिद्धांपैकी अनेक मूर्ती या योगशास्त्राशी संबंधित असतात. या भागामध्ये उत्तर चालुक्य यांच्या राजवटीत त्या स्थापन झालेल्या असू शकतात. चाणक्य राष्ट्रकुट यादव काळात जैन आणि हिंदू मंदिरे निर्माण झाली होती. लेणी स्थापत्य वगळता बौद्ध धर्मीय अवशेष कुठेही आढळत नाहीत. शिवाच्या मंदिरात सिद्धाचे अंकन आढळून येते. आदिनाथ अर्थात शिव आणि त्याचे ८४ सिद्ध मंदिरावर दिसून येतात. मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ यांचीदेखील शिल्पे अनेक भागांत आहेत. चारठाणा, डेंगळे पिंपळगाव, हत्ता, उटी येथे अशी शिल्पे आहेत. मुळात ही मूर्ती हाट योगातील अनेक मुद्रांपैकी एक सिद्ध मुद्रा आहे. मुद्रा साम्यांमुळे लोकांना ती बुद्धमूर्ती वाटत आहे. प्रत्यक्षात ती सिद्धमूर्ती आहे. सहाव्या शतकातील मंदिर असून, ४० वर्षांपूर्वी मंदिराच्या बाजूला तलाव निर्माण झाला त्यावेळी ही शिल्पे गाडली गेली असावीत, अशी शक्यता आहे.

ते शिल्प नेमके कोणते?यासंदर्भामध्ये अंतरंग रचनेची शीळ ध्यान अवस्थेतील आहे. जैन, बौद्ध आणि हिंदू धर्मात अशी शिल्पे असतात. परंतु जैन तीर्थंकरांपैकी अशा मुद्रेमध्ये कोणतीच मूर्ती आढळत नाही. भगवान गौतम बुद्धांचीही अशा प्रकारची मूर्ती कुठे दिसत नाही. त्यामुळे हे शिल्प नाथ संप्रदायातील सिद्ध शिल्प असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

मंदिरातील शिल्प असू शकतेया भागामध्ये बुद्ध मंदिर किंवा बुद्ध लेणी संदर्भात कुठलीही माहिती उपलब्ध नाही. हे शिवालय असू शकते. शिवालयाच्या गर्भगृह, उपदेवता अशा पद्धतीच्या मंदिरातील हे शिल्प असू शकते. त्या भागामध्ये नवग्रह पॅनल आढळून आले आहेत. शिवाय कामशिल्प, प्रसूतिशिल्प आढळून आल्याने अशा प्रकारची शिल्पे मराठवाड्याच्या अनेक मंदिरांजवळ उपलब्ध आहेत. त्यामुळे या ठिकाणीही मंदिरच असावे व ती मूर्ती सिद्धमूर्ती असण्याची शक्यता आहे. - कांतराव सोनवटकर, मूर्तिशास्त्र अभ्यासक

टॅग्स :parabhaniपरभणीArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षण