शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

परभणीच्या वेदशाळेत मुलांवर लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 02:15 IST

ब्राह्मण समाजात तीव्र संताप; गुन्हा दाखल

मुंबई : परभणी येथील श्री गणेश वेदपाठशाळेत वेदशास्त्रसंपन्न होण्यास शिकणाऱ्या तीन कोवळ्या मुलांवर संस्थाचालकांच्या नात्यातील अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने ब्राह्मण समाजात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी पाठशाळेचे संचालक सुधीर कुलकर्णी आणि अन्य दोघांविरुद्ध परभणीच्या नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कुलकर्णी यास अटक करण्यात आली आहे.ज्या तिघांवर लैंगिक अत्याचार झाले त्यांच्या पालकांनी तीनपैकी दोन मुलांना सोबत घेऊन शुक्रवारी परभणीचे जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांची भेट घेऊन अनन्वित अत्याचाराची कहाणी सांगितली. उपाध्याय यांनी लगेच तक्रार दाखल करवून घेण्याचे आदेश दिले. दोन मुलांनी आपबिती सांगितली तेव्हा बयाण तसेच आॅडिओ-व्हिडीओ रेकॉर्डिंग करणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारीदेखील चक्रावून गेले. ज्याचा प्रचंड लैंगिक छळ झाला असा तिसरा मुलगा त्याच्या गावी इस्पितळात उपचार घेत असून, त्याच्या जखमांवर डॉक्टरांना कितीतरी टाके घालावे लागले आहेत.अत्याचारग्रस्त मुलांना न्याय मिळावा म्हणून ब्राह्मण समाजातील अनेक वेदशास्रसंपन्न व्यक्ती तसेच पुरोहितांनी परभणीच्या पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. दुसरीकडे समाजातील प्रकरण आपसात मिटवा, असा दबाव पालकांवर आणण्याचेही समाजातीलच काही व्यक्तींकडून प्रयत्न झाले. त्यासाठी परभणीतील एका दोन बड्या लोकप्रतिनिधीला मध्यस्थी करण्याचाही प्रयत्न झाला; पण पालकांनी ते धुडकावून लावत त्या लोकप्रतिनिधींना अक्षरश: पिटाळून लावले.घृणास्पदरीत्या छळगेल्या महिन्यापासून या मुलांवर लैंगिक अत्याचार सुरू होते. अत्याचार करणारे दोघेही त्याच शाळेचे विद्यार्थी आहेत. मुलांना नग्न करून उलटे टांगणे, पाइपने जबर मारहाण करणे, गुप्तांगास दोरी बांधून ओढणे असे घृणास्पद प्रकार केले गेले. या प्रकाराकडे संस्थाचालक कुलकर्णी यांनी डोळेझाक केल्याचे पालकांनी तक्रारीत म्हटले.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळ