शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यातील सात प्रकल्प कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 23:48 IST

जिल्ह्यातील सात प्रकल्पांमध्ये पाणीसाठा शिल्लक नसल्याने टंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे़ येलदरी, निम्न दूधना, करपरा, मासोळी हे सर्वच प्रकल्प कोरडे पडले आहेत़ त्यामुळे आगामी काळातील पाण्याचा प्रश्न जिल्हावासियांना सतावणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील सात प्रकल्पांमध्ये पाणीसाठा शिल्लक नसल्याने टंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे़ येलदरी, निम्न दूधना, करपरा, मासोळी हे सर्वच प्रकल्प कोरडे पडले आहेत़ त्यामुळे आगामी काळातील पाण्याचा प्रश्न जिल्हावासियांना सतावणार आहे़अर्ध्या मराठवाड्याची तहान भागविणारा प्रकल्प अशी जिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्पाची ख्याती असली तरी आज मात्र या प्रकल्पात जीवंत पाणीसाठा शिल्लक नाही़ मृतसाठ्यामध्ये १०२ दलघमी पाणीसाठा शिल्लक असल्याची आकडेवारी प्रशासनाकडून दिली जात आहे़ परंतु, या मृतसाठ्यात गाळ किती याचा अंदाज नसल्याने १०२ दलघमी पैकी किती पाणी उपलब्ध होवू शकते़ हाही प्रश्नच आहे़ मागील वर्षीच्या उन्हाळ्यात परभणीसह ४ तालुक्यांना दिलासादायक ठरलेला निम्न दूधना प्रकल्प यावर्षी कोरडा पडला आहे़ या प्रकल्पातही जीवंत पाणीसाठा शिल्लक नाही़ विशेष म्हणजे मागील वर्षी एप्रिल महिन्यात या प्रकल्पात ४८ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता़सद्यस्थितीला मृतसाठ्यामध्ये ९३़२०० दलघमी पाणी शिल्लक आहे़ हे पाणी सेलू शहरासह तालुक्यातील इतर गावांसाठीच वापरावे लागणार आहे़ परिणामी परभणी, पूर्णा या दोन तालुक्यांना पाण्यासाठी पर्याय शोधावा लागणार आहे़जिंतूर तालुक्यात करपरा मध्यम प्रकल्पामध्ये ०़६९३ (३ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे तर गंगाखेडच्या मासोळी मध्यम प्रकल्पामध्ये उपयुक्त पाणीसाठा शिल्लक नाही़ त्यामुळे हा प्रकल्प कोरडाठाक पडला आहे़ याशिवाय जिल्ह्यात २२ लघु प्रकल्प आहेत़ परंतु, एकाही प्रकल्पात पाणीसाठा नसल्याने ग्रामीण भाग टंचाईच्या कचाट्यात सापडला आहे़ या प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजना सद्यस्थितीला ठप्प आहेत़ ग्रामीण, शहरी भागासाठी पाणी आणायचे कोठून? असा प्रश्न निर्माण झाला आहे़४गोदावरी नदीवर परभणी जिल्ह्यात पाच बंधारे बांधले आहेत़ त्यापैकी पालम तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्यात सध्या २़४४ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे़ मात्र या पाणीसाठ्यावर परभणीकरांचा हक्क नाही़ त्यामुळे पाणी असूनही हा बंधारा जिल्ह्यासाठी कोरडाच म्हणावा लागेल़ तर मुदगल ढालेगाव, मुळी या बंधाऱ्यातही पाणीसाठा शिल्लक नसल्याने बंधारा परिसरातील अनेक गावांत टंचाई निर्माण झाली आहे़४दुष्काळाबरोबरच प्रशासकीय उदासिनतेचा फटका या बंधाऱ्यांना बसला आहे़ गंगाखेड तालुक्यात मुळी येथील बंधाºयाला दोन वर्षांपासून दरवाजे बसविले नाहीत़ त्यामुळे बंधाºयात पाणीसाठाच झाला नाही़ त्याचा फटका या परिसरातील शेतकºयांना सहन करावा लागत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी