शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत दरोडेखोरांच्या मारहाणीत सात जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 13:20 IST

दरोडेखोरांनी रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज लुटला

परभणी : शहरातील दत्तधाम परिसरातील शांतीनिकेतन कॉलनीत गुरुवारी मध्यरात्री धाडसी दरोडा पडला असून, दरोडेखोरांच्या मारहाणीत सात जण जखमी झाले आहेत. सहा जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात तर एका जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

येथील वसमत रोडवरील दत्तधाम परिसरात असलेल्या शांतीनिकेतन कॉलनीत वासुदेवराव चक्रवार यांचे निवासस्थान आहे. २९ मे रोजी घरातील सर्व सदस्य झोपलेले असताना ३० मे रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घराचा मुख्य दरवाजा तोडून चारोटे घरात घुसले. या चोरट्यांनी घरातील सदस्यांना लाकूड आणि रॉडने मारहाण केली. तसेच महिलांच्या कानातील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. या मारहाणीत वासुदेव चक्रवार (५५), सविता चक्रवार(५०) प्रेमला मालेवार (६०),  चंद्रकला पद्मावार (८०), ऋषी चक्रवार (३५), अंकिता चक्रवार (२८) हरीश चक्रवार (२६)असे सात जण जखमी झाले आहेत. किरकोळ जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. हरीष चक्रवार हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेनंतर परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी संजय परदेशी, नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर तटआदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच श्वानपथक ठसे तज्ञही घटनास्थळी दाखल झाले होते. दरोडेखोरांनी रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी अद्याप गुन्हा नोंद झाला नव्हता.

टॅग्स :RobberyदरोडाPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल