परभणी : ‘एक अर्ज योजना’ अनेक या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील जवळपास ६० हजार शेतकऱ्यांनी प्रस्ताव दाखल केले होते. या प्रस्तावांमधून कृषी विभागाने लकी ड्रॉ पद्धतीने पहिल्या टप्प्यात ३ हजार ५२० लाभार्थ्यांची निवड केली आहे.
कृषी विभागातील योजना मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वतंत्र अर्ज सादर करावा लागत होता. त्यामुळे शेतकऱ्यांचा पैसा व वेळ मोठ्या प्रमाणात खर्च होत होता. शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी राज्य शासनाने महाडीबीडी पोर्टल अंतर्गत १ अर्ज योजना अनेक या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर परभणी जिल्ह्यात एकदा मिळालेल्या मुदतवाढीपर्यंत ६० हजार प्रस्ताव शेतकऱ्यांनी दाखल केले होते. दाखल प्रस्तावांमधून कृषी विभागाने लकी ड्रॉ पद्धतीने काही लाभार्थ्यांची निवड केली आहे. यामध्ये मोटार, इंजिनसाठी ४५, पाईपलाईनसाठी १९० तसेच सूक्ष्म सिंचन, तुषार, ठिबकसाठी ३ हजार ३८५ लाभार्थ्यांची निवड केली आहे.