शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

वाळू तस्कर पोलिसांवर पडले भारी; अंगावर घातले भरधाव ट्रॅक्टर, शेतपिकांचे नुकसान करत फरार

By ज्ञानेश्वर भाले | Updated: January 8, 2024 14:09 IST

वाळू खाली टाकत भरधाव ट्रॅक्टरने दोन जणांच्या शेतपिकांचे केले लाखोंचे नुकसान

सेलू (परभणी) : सेलू ठाण्याचे पोलीस शिपाई यांनी शनिवारी सकाळी साडेनऊला वालूर परिसरात अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा पाठलाग करतांना ट्रॅक्टर चालकांनी भरधाव वेगाची प्रथमतः पोलीसांना भिती धाखवून रेती खाली टाकून दिली. दरम्यान या ट्रॅक्टरने पुढे दोन जणांच्या शेतातील २ लाख ५० हजार रूपयेच्या पिकांचे नुकसान, एकाच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिन आरोपीविरुद्ध सेलू ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या पोलिस शिपायांने सुट्टीवर असलेल्या पोलीस निरीक्षकांच्या संपर्कात राहत ही कारवाई केली अशी माहिती पुढे येत आहे. अखेर वाळू तस्करी करणारे पोलीसांनाच पडले भारी अशी चर्चा सुरू आहे.                  पोलिस शिपाई अमोल नागनाथ वाडेकर यांनी वालूर परिसरात शनिवारी सकाळी  बबन धुळगुंडे, गोपाळ पाढरे व अन्य एक इसम हे त्यांचे ताब्यातील हिरव्या रंगाचा जॉनडियर कंपनीचे ट्रॅक्टर व फिकट लालसर रंगाचे ट्रॉलीमध्ये विनापरवाना बेकायदेशीर रित्या चोरटी वाळू वहिती करीत असताना मिळून आले. त्यांना थांबण्याचा इशारा केला असता न थांबता भरधाव वेगात ट्रक्टर अंगणवाडीकडे जाणारे रोडने पळवुन चालु स्थिती जॅकने वाळू रोडवर टाकली व ट्रॅक्टर घेऊन डुघरा रोडने भरधाव वेगाने पळुन गेले. पोलिस शिपाई वाडेकर यांचे फिर्यादीवरून प्रभारी पो.नी. विजय कांबळे यांचे आदेशाने तिन जणांवर गुन्हा दाखल केला. पोलीस जमादार अशोक हींगे यांचेकडे तपास दिला आहे.

अन् आडीच लाखाचे शेतपिकांचे नुकसानशैलेश सुरेन्द्र तोष्णीवाल यांनी सेलू ठाण्यात फिर्याद दिली की, बबन धुळगुंडे, गोपाळ पाढरे व एक सोबतचा इसम यांनी ६ जानेवारीला त्यांचे ताब्यातील हिरव्या रंगाचे  भरधाव ट्रॅक्टर ( एम एच १२ पी ५८६७) हे फिर्यादीचे शेतात अनाधिकृतरीत्या प्रवेश करून त्याचे शेतातील कापस पिकाचे अंदाजे १ लाख ५० हजाराचे नुकसान केले. याप्रकरणी प्रभारी पोनी एस.टी. चव्हाण यांचे आदेशाने तीन जणांवर गुन्हा दाखल केला. पोलीस हवालदार जाधव यांचेकडे तपास दिला आहे.              दूसरा गुन्हा दाखल या प्रकरणात आणखीन एक फिर्याद  कृष्णा दत्ता भोगावकर यांनी ठाण्यात दिली की, बबन धुळगुंडे, गोपाळ पाढरे व एक सोबतचा इसम यांनी ६ जानेवारीला त्यांचे ताब्यातील हिरव्या रंगाचे भरधाव ट्रॅक्टर हे फिर्यादी हे त्यांनी बटइने केलेल्या शेतामध्ये ज्वारीचे पीकास पाणी देत असतांना शेतात अनाधीकृत प्रवेश करून व त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर भरधाव गेवात चालवुन पिकाचे नुकसान (अंदाजे १लाख) करीत असतांना फिर्यादीने थांबविण्याचा प्रयत्न केला असता फिर्यादीचे अंगावर जिवे मारण्याच्या उदेशाने ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. प्रभारी पो.नी.विजय कांबळे यांचे आदेशाने तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोउपनी पंडीत यांचेकडे तपास दिला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी