शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

सेलुतील जवानाची पत्नी व मुलगी अरूणाचल प्रदेश येथून २३ दिवसांपासून बेपत्ता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 18:31 IST

सेलू येथील भारतीय सैन्य दलातील जवानाची पत्नी आणि एक वर्षाची मुलगी अरूणाचल प्रदेशातील टेंगा येथून २० सप्टेंबरपासून बेपत्ता झाली आहे. २३ दिवस उलटूनही या दोघांचा शोध लागत नसल्याने जवानासह कुटुंबिय चिंताग्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्दे जवानाची पत्नी आणि एक वर्षाची मुलगी अरूणाचल प्रदेशातील टेंगा येथून बेपत्ता २० सप्टेंबरपासून बेपत्ता असून २३ दिवस उलटूनही या दोघांचा अद्याप शोध नाही डोंगरा पोस्ट जवळील सीसीटीव्ही कॅमे-यात दोघेही एका वाहनात बसल्याचे दिसून आले होते

परभणी, दि. १३ : सेलू येथील भारतीय सैन्य दलातील जवानाची पत्नी आणि एक वर्षाची मुलगी अरूणाचल प्रदेशातील टेंगा येथून २० सप्टेंबरपासून बेपत्ता झाली आहे. २३ दिवस उलटूनही या दोघांचा शोध लागत नसल्याने जवानासह कुटुंबिय चिंताग्रस्त झाले आहेत. अरुणाचल प्रदेशातील स्थानिक पोलीस प्रशासन त्यांचा योग्य पद्धतीने शोध घेत नसल्याचा आरोप करत गोंडगे कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. 

सेलू येथील अनिल गोंडगे (मूळ गाव गोंडगे पिंपरी, ता. सेलू) हे भारतीय सैन्य दलात नायक पदावर कार्यरत आहेत. काही महिन्यापूर्वीच त्यांची अरूणाचल प्रदेशातील टेंगा या ठिकाणी नियुक्ती झाली होती. जवान गोंडगे हे पत्नी आणि दोन मुलांसह अरूणाचल प्रदेशातील टेंगा या ठिकाणी असलेल्या लष्करी वसाहतीत राहतात. २० सप्टेंबर रोजी त्यांची पत्नी स्वप्ना (वय ३३) व एक वर्षाची मुलगी आरा यांनी टेंगा येथून जवळ असलेल्या नागोबा मंदिराला जात असल्याचे सांगून घर सोडले होते. रात्री उशिरापर्यंत स्वप्ना या परत न आल्याने त्यांचा शोध सुरू केला. परंतु, परिसरातील ८ ते ९ कि.मी. पर्यंत शोध घेऊनही दोघांचाही थांग पत्ता लागला नाही. त्यानंतर अनिल गोंडगे यांनी पत्नी स्वप्ना व मुलगी आरा हे बेपत्ता झाल्याची तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये नोंदविली. 

सीसीटीव्हीत दिसून आले होते भारतीय सैन्य दल, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव बल, आयटीबीपी यांच्या पथकानीही स्वप्ना व आरा याचा शोध सुरू केला होता. यावेळी  डोंगरा पोस्ट जवळील सीसीटीव्ही कॅमे-यात स्वप्ना व मुलगी आरा हे दोघे एका वाहनात बसल्याचे फुटेज आढळले. परंतु, त्यानंतरही या दोघांचाही शोध लागला नाही. अरूणाचल प्रदेश आणि आसाम सिमेपर्यंत भारतीय सैन्य दलाने शोध घेतला. परिसरातील पालिकोम यासह महत्त्वाच्या रेल्वेस्थानकावरही शोध लागला नाही. त्यामुळे चिंतातूर असलेले जवान अनिल गोंडगे हे ओम (वय ७) या मुलासह ११ आॅक्टोबर रोजी सेलू येथील घरी परतले. दरम्यान, २३ सप्टेंबर रोजी अनिल गोंडगे यांच्या वहिणी वंदना आणि 

सासरे प्रल्हादराव काळे यांच्या मोबाईल क्रमांकावर अनोळखी कॉल आले. परंतु, फोनवर कोणीही बोलले नाही. कॉल आलेल्या नंबरच्या आधारे शोध लावावा, अशी मागणी गोंडगे कुटुंबियांंनी केली आहे. तसेच स्थानिक पोलिसांनी गांभीर्याने मोहीम राबविली नाही. आसाम, अरूणाचल भागात बोडो उल्फा, अल्फा या स्थानिक संघटना हिंसाचार घडवितात. अनावधानाने पत्नीने आसाम राज्याची सीमा ओलांडली असेल तर अपहरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांनी शोध घेण्यासाठी मदत करावी, अशी मागणी नायक अनिल गोंडगे यांनी केली आहे.