शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात सेलू, जिंतूरमध्ये कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 00:16 IST

भारतीय जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदविण्यासाठी १८ फेब्रुवारी रोजी सेलू आणि जिंतूर शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : भारतीय जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदविण्यासाठी १८ फेब्रुवारी रोजी सेलू आणि जिंतूर शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला़जिंतूरमध्ये पुलवामा घटनेच्या निषेधार्थ सोमवारी जिंतूर शहरात बंद पाळून नागरिकांनी मुख्य मार्गाने मोर्चा काढला़ त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देऊन दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली़पुलवामा येथील भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदविण्यासाठी १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणातून मोर्चाला प्रारंभ झाला़ शहरातील व्यापारी, विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, डॉक्टर, वकील, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते़ व्यापाऱ्यांनी १०० टक्के बंद ठेवून घटनेचा निषेध केला़ दरम्यान, मोर्चेकºयांनी शहीद जवान अमर रहे, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तानला धडा शिकवा, अशा घोषणा दिल्या़ सुमारे १० हजार नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते़ जिंतूर येथील तहसीलदार सुरेश शेजूळ यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ यावेळी आ़ विजय भांबळे, माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख, व्यापारी महासंघाचे रमेश दरगड, माहेश्वरी संघाचे जिल्हाध्यक्ष ब्रिजगोपाल तोष्णीवाल, भाजपाचे खंडेराव आघाव, राजेश वट्टमवार, प्रदीप चव्हाण, प्रदीप देशमुख, उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे, उपसभापती विजय खिस्ते, नगरसेवक कपील फारुखी, सुनील तोष्णीवाल, राजू देवकर, सत्यनारायण शर्मा, मौलाना तंजमूल, महेश चैतन्य महाराज, सुधीर शहाणे प्रदीप कोकडवार, शेख ताज, कैलास थिटे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते़सेलू शहरातही बंद४सेलू शहरातील सामाजिक संघटनांच्या पदाधिकाºयांनी सोमवारी सकाळी १०़३० वाजेच्या सुमारास हल्ल्याच्या निषेधार्थ क्रांती चौकातून आठवडी बाजार, स्टेशन रोड, बसस्थानक रोड, रायगड कॉर्नर मार्गावरून फिरून बंदचे आवाहन केले़४क्रांती चौक येथे शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली़ सोमवारी दिवसभर शहरातील मुख्य बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून व्यापाºयांनीही बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला़ विशेष म्हणजे शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली होती.

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलन