शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पाच दिवसांच्या संचारबंदीनंतर खरेदीसाठी नागरिकांची एकच झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 16:13 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या संचारबंदीमुळे ठप्प पडलेली बाजारपेठ सोमवारी सुरळीत झाली.

ठळक मुद्देचाट भांडार, चहाची दुकानेही सुरूकिराणा दुकानांमध्येही तोबा गर्दी

परभणी : पाच दिवसांच्या संचारबंदीनंतर सोमवारी शहरातील बाजारपेठ सुरू झाली असून, पोळा आणि गणगौरींच्या सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. गांधीपार्क, गुजरी बाजार आणि स्टेशनरोड भागात दिवसभर मोठ्या प्रमाणात नागरिकांची झुंबड दिसून आली.

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी ९ ते १४ आॅगस्ट अशी पाच दिवसांची संचारबंदी लागू केली होती. शुक्रवारी रात्री ही संचारबंदी शिथील झाल्यानंतर शहरात शनिवार आणि रविवार असे दोन दिवस बाजारपेठ सुरू राहिली. मात्र या संदर्भात जिल्हा प्रशासनाचा अधिकृत निर्णय नव्हता. त्यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी बाहेर पडणे टाळले. सोमवारी मात्र शहरातील बाजारपेठेतील सर्व दुकाने सुरू झाली. विशेष म्हणजे, चहा दुकाने आणि चॅट भांडारही सुरू करण्यात आले. १८ आॅगस्ट रोजी जिल्हाभरात पोळ्याचा सण साजरा केला जात आहे. तसेच २२ आॅगस्टपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. त्यामुळे सण आणि उत्सवाला लवकरच प्रारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात सोमवारी बाजार फुलला होता. येथील गांधी पार्क भागात मातीचे बैल विक्रीसाठी आले होते. तसेच पूजेचे साहित्य आणि इतर साहित्याचेही स्टॉल्स लागले होते.

सणांचे दिवस असल्याने किराणा साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. त्यामुळे कच्छी बाजार, अष्टभूजा देवी मंदिर चौक, स्टेशनरोड या भागातील किराणा दुकानांवर नागरिकांची मोठी गर्दी दिवसभर होती. या काळात सोशल डिस्टन्सचेही जागोजागी उल्लंघन झाले. मात्र मनपाचे कोणतेही पथक शहरात फिरताना आढळले नाही. त्यामुळे सर्रास सोशल डिस्टन्सचा बोजवारा उडाला होता.  एकंदर आठ दिवसानंतर शहरात पुन्हा एकदा बाजारपेठ फुलली असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या संचारबंदीमुळे ठप्प पडलेली बाजारपेठ सोमवारी सुरळीत झाली. येत्या तीन-चार दिवसांमध्ये या गर्दीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे प्रशासनाने आताच उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत  आहे़ 

बँकेसमोर पुन्हा रांगा- शहरातील बँकांसमोर लागणाऱ्या ग्राहकांच्या रांगा कमी होत नसल्याची स्थिती आहे. स्टेशनरोडवरील भारतीय स्टेट बँक, महाराष्टÑ बँक, नानलपेठ कॉर्नरवरील आंध्रा बँक या बँकांसह इतर बँकांसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. - विशेष म्हणजे, फिजिकल डिस्टन्सचे उल्लंघन करीत ग्राहक एकमेकांना चिटकून रांगेत उभे होते. बँकेसमोर सोशल डिस्टन्सचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी बँक प्रशासनावर देण्यात आली आहे. मात्र प्रशासन या संदर्भात फारसे गांभिर्याने काम करीत नसल्याची बाब दिसून आली. - अनेक बँकांनी सुरुवातीला सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी चौकोण आखून दिले जात आहेत़ मात्र त्याचेही पालन होत नाही़ त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन होत असून,  शहरात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जागोजागी वाहतूक ठप्पसोमवारी शहरात रस्त्यावरही मोठी गर्दी झाली होती. रस्त्या-रस्त्यांवर वाहतुकीच्या समस्या निर्माण झाल्या. स्टेशनरोड, नारायण चाळ, अष्टभूजा देवी मंदिर, शिवाजी चौक या भागात अनेक वेळा वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे बाजारपेठ सुरू होताच शहरातील वाहतुकीच्या समस्येने पुन्हा डोके वर काढले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याparabhaniपरभणीMarketबाजार