शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
2
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
3
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
4
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
5
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
6
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
7
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
8
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
9
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
10
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
11
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
12
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
13
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
14
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
15
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
16
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
17
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
18
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
19
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
20
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान

परभणी जिल्हा क्रीडा संकुलात तयार होईना रनिंग ट्रॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 23:18 IST

येथील जिल्हा क्रीडा संकुलात खेळाडुंसाठी रनिंग ट्रॅक तयार करण्याचे आदेश तत्कालीन क्रीडा आयुक्त तथा विभागीय आयुक्त सुुनिल केंद्रेकर यांनी क्रीडा अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र एक वर्षाचा कालावधी उलटल्यानंतरही अद्याप क्रीडा संकुलात रनिंग ट्रॅक तयार करण्यात आला नाही. त्यामुळे येथील क्रीडा अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या आदेशालाच खो दिल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिल्हा क्रीडा संकुलात खेळाडुंसाठी रनिंग ट्रॅक तयार करण्याचे आदेश तत्कालीन क्रीडा आयुक्त तथा विभागीय आयुक्त सुुनिल केंद्रेकर यांनी क्रीडा अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र एक वर्षाचा कालावधी उलटल्यानंतरही अद्याप क्रीडा संकुलात रनिंग ट्रॅक तयार करण्यात आला नाही. त्यामुळे येथील क्रीडा अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या आदेशालाच खो दिल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात दर्जेदार खेळाडू निर्माण होऊन राज्य व देशपातळीवर जिल्ह्याचा नाव लौकिक करावा, या हेतूने प्रत्येक तालुक्यासह जिल्ह्याच्या ठिकाणी क्रीडा संकूल उभारण्यात आले. परभणी शहरात प्रियदर्शनी इंदिरा गांधी नावाने दोन ते चार एकरमध्ये सुसज्ज असे क्रीडा संकूल उभारण्यात आले आहे.या ठिकाणी ग्रामीण भागासह शहरातील खेळाडू सराव करण्यासाठी येतात; परंतु, मागील काही वर्षापासून या क्रीडा संकुलाची दुरवस्था झाली आहे. जागोजागी कचºयाचे ढीग, त्याच बरोबर संकुलावर टाकण्यात आलेली पत्रेही वादळी वाºयात उडून गेली आहेत. तर काहींची दुवस्था झाली आहे. सरावासाठी येणाºया खेळाडुंना कोणतीही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत नाही. त्याच बरोबर मैदानावर पाणीही मारण्यात येत नाही. त्यामुळे खेळाडुंना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. एक वर्षापूर्वी तत्कालीन क्रीडा आयुक्त सुनिल केंद्रेकर हे परभणी जिल्हा दौºयावर आले असता त्यांनी जिल्हा क्रीडा संकुलाची पाहणी केली. त्यावेळी संकुलात असलेली अस्वच्छता पाहूून तत्कालीन क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे यांना चांगलेच धारेवर धरले होते. स्वत: व इतर अधिकाºयांसमवेत संकुलातील कचरा केंद्रेकर यांनी वेचला होता. त्यानंतर त्यांनी प्रत्येक विभागाची पाहणी करून तीव्र नाराजी व्यक्त केली होती. शहरातील नागरिकांच्या व खेळाडुंच्या तक्रारी ऐकून घेत तत्कालीन क्रीडा अधिकारी साखरे यांना एक महिन्याच्या आत क्रीडा संकुलात रनिंग ट्रॅक तयार करा? असे आदेश दिले होते; परंतु, क्रीडा संकुलात खेळाडुंना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यात असमर्थता दाखविणाºया क्रीडा अधिकाºयांनी केवळ क्रीडा आयुक्तांसमोर मान हलविण्याचे काम केले. आयुक्त केंद्रेकर यांनी रनिंग ट्रॅक उभारण्याचे आदेश देऊनही अद्यापपर्यंत या संदर्भात क्रीडा अधिकाºयांनी कोणत्याही हालचाली सुरू केल्या नाहीत. त्यामुळे परभणी येथील क्रीडा विभागाने चक्क आयुक्तांच्या आदेशालाच खो दिल्याचे दिसून येत आहे. परिणामी क्रीडा प्रेमींमधून संताप व्यक्त केला जात आहे.तालुक्यातील क्रीडा संकुलाचीही दुरवस्था४तालुकास्तरावरील खेळाडुंना आपल्याच शहराच्या ठिकाणी कबड्डी, खो-खो, क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, पोलीस भरती आदी बाबत सराव करण्यासाठी तालुकास्तरावर क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात आली. मात्र जिल्ह्यातील पूर्णा, जिंतूर, सेलू, सोनपेठ यातील काही ठिकाणी तर संकुलच अस्तित्वात नाही. तर ज्या ठिकाणी क्रीडा संकुल आहे, त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे क्रीडा विभागाच्या उदासिन भूमिकेमुळे दर्जेदार खेळाडू तयार होण्यास ब्रेक लागत असल्याचे नागरिकातून बोलल्या जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीcommissionerआयुक्त