शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

परभणी मनपा सभा २० मिनिटांत गुंडाळली; भाजप-राष्ट्रवादी सदस्यांचा आयुक्तांच्या केबिनमध्ये ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 16:09 IST

"व्हिडिओ दाखवा, मगच बाहेर पडू"; सभा संपवल्याच्या मुद्द्यावरून परभणी मनपा आयुक्तांच्या केबिनमध्ये सदस्यांची आक्रमक भूमिका.

- राजन मंगरूळकरपरभणी : महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा गुरुवारी दुपारी २.३० वाजता आयोजित केली होती. ही सभा २० ते २२ मिनिटात दोन विषयांच्या प्रक्रियेतच पूर्ण झाली. सभा समतीच्या प्रक्रियेपूर्वी दाखल झालेल्या भाजप, राष्ट्रवादी आणि शहर विकास आघाडी असे काही सदस्य सभागृहात दाखल झाले. मात्र, सभा संपून आयुक्त आणि महापौर, उप महापौर हे बाहेर पडले. त्यामुळे सभेत शहर विकासाचे प्रश्न व अन्य बाबी यावर चर्चा न करताच सभा संपलेल्याचा आरोप करीत जवळपास २८ सदस्यांनी बी. रघुनाथ सभागृह येथून आयुक्तांची केबिन गाठून केबिनमध्ये ठिय्या मांडला. 

मनपाची तिसरी विशेष सर्वसाधारण सभा गुरुवारी दुपारी बी. रघुनाथ सभागृहात आयोजित केली होती. या सभेमध्ये एकूण २ विषय ठेवले होते. स्थायी समिती सदस्यांची निवड व विविध समित्या वरील समिती सदस्यांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली. सुमारे २० मिनिट झालेल्या या बैठकीत इतर प्रश्नावर चर्चा झाली नाही. दोन्ही विषयांची प्रक्रिया पूर्ण होतात भाजप राष्ट्रवादी आणि शहर विकास आघाडीचे काही सदस्य सभाग्रहमध्ये दाखल झाले. परंतु थेट राष्ट्रगीत सुरू झाले आणि उर्वरित शहर विकासाच्या प्रश्नावर कुठलीही चर्चा न करता सभा संपविल्याचा आरोप करीत या सदस्यानी बी. रघुनाथ सभागृह सोडून मनपा आयुक्त यांचे केबिन गाठले. सुमारे २० मिनिटपासून हा ठिय्या सुरू आहे. 

या आंदोलनात राष्ट्रवादीचे गटनेते विजय जामकर, भाजपा गटनेता तिरुमला खिल्लारे, शहर विकास आघाडीचे गटनेते सागर गांगाळे यांच्यासह महिला आणि तिन्ही पक्षातील जवळपास २८ सदस्य सहभागी झाली आहेत. 

व्हिडिओ दाखवा मगच बाहेर जाऊ आम्ही सभेच्या सभागृहामध्ये उशिराने आलो नाही, तरी सभा थेट संपवण्यात आली. विरोधी पक्षाच्या सदस्यांना विचारात न घेता सभा संपली. यामुळे आता आम्ही उशिरा आलो की आधी आलो याचा सभेतील पुराव्याचा व्हिडिओ दाखवा मगच आम्ही केबिनमधून बाहेर पडू, अशी भूमिका सर्व सदस्यांनी घेतली आहे. 

शहराचे प्रश्न बाजूलाच सभागृहातून थेट आयुक्तांच्या केबिनमध्ये आलेल्या सर्व सदस्यांनी आयुक्तांना शहरी विकासाच्या प्रश्नावर धारेवर धरले.  विविध प्रकारची बिले दिली जात आहेत प्रत्यक्षात कामे कुठे आहेत, नागरिक आम्हाला जाब विचारत आहेत. त्यामुळे सर्वसाधारण सभा लावून त्यामध्ये विविध प्रकारचे प्रश्न चर्चेला येणे अपेक्षित आहे , अशी भूमिका सदस्यांनी घेतली. शहराचे प्रश्न बाजूलाच ठेवून सभा संपविण्याचा घाट घातल्याचे सदस्यांनी व्यक्त केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani Municipal Corporation Meeting Ends Quickly; Protest in Commissioner's Office

Web Summary : Parbhani's municipal meeting ended in 20 minutes, sparking protests. BJP and NCP members occupied the commissioner's office, alleging city development issues were ignored. Members demanded video proof of meeting proceedings.
टॅग्स :parabhaniपरभणीMunicipal Corporationनगर पालिका