मागासवर्गीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे मागासवर्गीय अधिकारी कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला आहे. याविरुद्ध रिपाइंच्या वतीने राज्यभरात आंदोलने केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून ७ जून रोजी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष डॉ. विजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. मागासवर्गीयांवर अन्याय करणारा हा आदेश रद्द करून पदोन्नतीतील आरक्षण कायम ठेवावे अन्यथा रिपाइं तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. विजय गायकवाड यांच्यासह राज्य सचिव माधवराव हातागळे, नवनाथ मुजमुले, कांता गवळी, शिवाजी सुगंधे, दत्तू कांबळे, बाबासाहेब ढोले, विलास पाईकराव, राजू पवार, निर्मला राठोड, अशोक मस्के आदी आंदोलनात सहभागी झाले होते.
आरक्षण कायम करण्याच्या मागणीसाठी रिपाइंचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:21 IST