शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
8
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
9
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
10
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
11
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
12
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
13
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
14
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
15
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
16
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
17
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
18
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
19
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
20
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश

परभणी जिल्ह्याच्या महसुलात गौण खनिजातून १४ कोटींची भर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 18:28 IST

जिल्ह्याच्या महसूलात भर घालण्यासाठी वाळू ठेक्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली असून, आॅक्टोबर महिन्याअखेर १४ कोटी ३२ लाख रुपयांचा महसूल जिल्हा प्रशासनाच्या खात्यात जमा झाला आहे.

ठळक मुद्देगौण खनिजाची वसुली आणि अवैध उत्खनन करणा-यांवर केलेल्या दंडात्मक कारवाया यातून १४ कोटी ३२ लाख १२ हजार रुपयांची वसुली झाली आहे.वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया सध्या सुरू असल्याने या महसूलात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

परभणी : जिल्ह्याच्या महसूलात भर घालण्यासाठी वाळू ठेक्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली असून, आॅक्टोबर महिन्याअखेर १४ कोटी ३२ लाख रुपयांचा महसूल जिल्हा प्रशासनाच्या खात्यात जमा झाला आहे. शिवाय वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया सध्या सुरू असल्याने या महसूलात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

गोदावरी, वाण, दुधना, पूर्णा या नद्या जिल्ह्यात प्रवाही असून, या नदी घाटावरील वाळूचे ठेके लिलावाद्वारे प्रशासन विक्री करते. जिल्ह्यात सुमारे ६५ वाळू घाट असून, त्याचा लिलाव दरवर्षी केला जातो. यावर्षी आता ही प्रक्रिया सुरू झाली आहे.वाळूसह, मुरुम, गिट्टीच्या उत्खननातूनही महसूल जमा केला जातो. गौण खनिज विभागाला यावर्षी ४२ कोटी रुपयांचे उद्दीष्ट शासनाने दिले आहे. आॅक्टोबर अखेर पर्यंत गौण खनिजाची वसुली आणि अवैध उत्खनन करणा-यांवर केलेल्या दंडात्मक कारवाया यातून १४ कोटी ३२ लाख १२ हजार रुपयांची वसुली झाली आहे. गौण खनिजाच्या वसुलीसाठी प्रत्येक तालुक्याला उद्दीष्ट ठरवून दिले आहे. त्यात जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्वाधिक ८ कोटी ४ लाख रुपयांची वसुली केली आहे. परभणी तालुक्यातून १ कोटी १७ लाख ८२ हजार रुपयांचा महसूल जमा झाला आहे.

गंगाखेड तालुक्यातून ७४ लाख, पूर्णा तालुक्यातून १ कोटी ९ लाख, पालम तालुक्यातून ९९ लाख, पाथरी तालुक्यातून ३७ लाख ८२ हजार, मानवत तालुक्यातून ७० लाख ५३ हजार, सेलू तालुक्यातून ३७ लाख २१ हजार आणि जिंतूर तालुक्यातून ४९ लाख १५ हजार रुपये जिल्हा प्रशासनाच्या गंगाजळीत जमा झाले आहेत. सोनपेठ तालुक्याने जिल्ह्यात सर्वात कमी वसुली केली आहे. या तालुक्याने केवळ ३१ लाख ६३ हजार रुपयांचीच वसुली आतापर्यंत केली आहे. मार्च २०१८ पर्यंत जिल्हा प्रशासनाला ४२ कोटी रुपयांचा महसूल जमा करायचा आहे. मात्र आतापर्यंत केवळ १४ कोटी रुपयांपर्यंतच वसुली झाल्याने आता गौण खनिजांच्या वसुलीवर प्रशासनाला भर द्यावा लागणार आहे.

९८ लाखांचा दंड केला वसूलसात महिन्यांत केलेल्या कारवाईत जिल्हा प्रशासनाच्या गौण खनिज विभागाने ९८ लाख ९६ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. गंगाखेड तालुक्यात सर्वाधिक अवैध वाळू उपसा होत असून, या तालुक्यात ३४ लाख ९४ हजार रुपये दंडातून वसूल करण्यात आले. त्याचप्रमाणे  पालम तालुक्यात २० लाख, परभणी तालुक्यात ९ लाख ९२ हजार रुपये दंड वसूल झाला आहे.  उपविभागांचा विचार करता परभणी उपविभागात ९ लाख ९२ हजार, गंगाखेड उपविभागात ६३ लाख ८६ हजार, पाथरी उपविभागात १४ लाख ७८ हजार आणि सेलू उपविभागातून १० लाख ४० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

अवैध उत्खनन, वाहतूक : ३७ गुन्हे दाखलवाळू घाटातून बेसुमार वाळूचा उपसा केला जात आहे. याला आळा घालण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कमी पडत आहे. वाळूचे अवैध उत्खनन आणि वाहतूक केल्याप्रकरणी सात महिन्यात प्रशासनाने ३०१ कारवाया केल्या असून, त्यातील ३७ प्रकरणांमध्ये थेट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. गंगाखेड उपविभागात २१, पाथरी उपविभागात १३ आणि सेलू उपविभागात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.

दंड केला पण, रक्कम वसूल होईना...अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कारवाया केल्या जातात. सोनपेठ तालुक्यात अवैध वाळू उपश्याचेही प्रमाण अधिक आहे. मात्र, प्रशासनाचा वचक नसल्याचे दिसत आहे. सोनपेठ तहसील कार्यालयाने ७ महिन्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाºयांविरुद्ध ३८ कारवाया केल्या आहेत. या कारवायात आरोपींना २० लाख ८१ हजार रुपयांचा दंडही ठोठावला. प्रत्यक्षात केवळ ६ लाख ८१ हजार रुपयांचा दंड वसूल झाला आहे. त्यामुळे ठोठावलेला दंड वसूल करण्यातही प्रशासकीय यंत्रणा कमी पडत असल्याचे दिसत आहे.

३३ टक्के उद्दिष्ट पूर्णआठ महिन्यांत गौण खनिज विभागाने ३३ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे़ आगामी चार महिन्यांत ६७ टक्के उद्दिष्ट पूर्ण करावे लागणार आहे़ 

टॅग्स :parabhaniपरभणी