शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

गंगाखेड येथील जप्त वाळूसाठ्याच्या लिलावातून शासनाला मिळाला  ८० लाखांंचा महसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2017 16:10 IST

मागील काही दिवसात अनाधिकृतरित्या साठा केलेली वाळू महसूल प्रशासनाने जप्त केली होती. मंगळवारी १५९ वाळू साठ्यांपैकी ६४ वाळूसाठ्यांचा लिलाव करण्यात आला.

ठळक मुद्दे १५९ वाळू साठ्यांपैकी ६४ वाळूसाठ्यांचा लिलाव करण्यात आला.जिल्हा प्रशासनाच्या तिजोरीत ८० लाख रुपये जमा झाले आहेत.

गंगाखेड (परभणी ) : मागील काही दिवसात अनाधिकृतरित्या साठा केलेली वाळू महसूल प्रशासनाने जप्त केली होती. मंगळवारी १५९ वाळू साठ्यांपैकी ६४ वाळूसाठ्यांचा लिलाव करण्यात आला. त्यातून जिल्हा प्रशासनाच्या तिजोरीत ८० लाख रुपये जमा झाले आहेत.

गंगाखेड तालुक्यातून गोदावरी नदीपात्रातील वाळूचा बेसुमार उपसा केला जातो. तालुक्यात ठिकठिकाणी वाळूसाठ्याचे ढिगारे करुन ठेवले होते. तहसील प्रशासाने हे अवैध वाळूसाठे जप्त केले. त्यात पिंपरी परिसरात ६४, मसला २७, सुरळवाडी १, कासारवाडी  ५, गंगाखेड शहर १६, मैराळ सावंगी ५, गौंडगाव २, महातपुरी २८, मुळी ५ असे १५९ वाळूसाठे जप्त करण्यात आले होते. जप्त केलेल्या वाळूसाठ्यांचा लिलाव करण्याची प्रक्रिया तहसील प्रशासनाने सुरु केली आहे.

या प्रक्रियांतर्गत उपविभागीय अधिकारी अमोलसिंह भोसले यांच्या अध्यक्षतेखाली लिलाव करण्यात आला. त्यात ६४ वाळूसाठ्यांचा लिलाव झाला असून ४ हजार ४७३ ब्रास वाळू लिलावाद्वारे विक्री करण्यात आली. यातून ८० लाख ६२ हजार ५१८ रुपयांचा महसूल प्रशासनाला मिळाला आहे. आतापर्यंत ६४ वाळूसाठ्यांचा लिलाव पूर्ण झाला आहे. महातपुरी परिसरातील शासकीय गायरान जमिनीवर अज्ञात व्यक्तींनी वाळूसाठे केले आहेत. परंतु, या साठ्यासाठी कोणीही बोली बोलली नाही. त्यामुळे महातपुरी परिसरातील ६ साठ्यांचा लिलाव झाला नाही. दरम्यान, ही सर्व वाळू सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृह परिसरात आणून टाकली आहे. 

कोट्यवधींचे वाळूसाठे पडूनदरम्यान, तहसील प्रशासनाने जप्त केलेल्या १५९ वाळूसाठ्यांपैकी आणखी ९५ वाळूसाठे जागीच पडून आहेत. या वाळूसाठ्यांचा लिलाव झाला तर महसूल प्रशासनाच्या तिजोरीत दीड ते दोन कोटी रुपये जमा होणार आहेत. पडून असलेल्या वाळूसाठ्यांचा लिलाव करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे तहसील प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.