शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

स्थलांतराला मिळतोय प्रतिसाद, सिडको प्रशासनाला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 02:53 IST

सिडको प्रशासनाला दिलासा : १५ जानेवारीची अंतिम मुदत

पनवेल : विमानतळबाधित ‘त्या’ दहा गावांच्या स्थलांतराला आता वेग प्राप्त झाला आहे. सिडकोच्या आवाहनानंतर ग्रामस्थांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने सिडकोला मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे अनेकदा मुदत देऊनही ज्या गावांनी स्थलांतर केले नाही, त्यांच्यासाठी १५ जानेवारी ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत स्थलांतराची प्रक्रिया पूर्ण होईल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गाभा क्षेत्रात येणाऱ्या दहा गावांचे अन्य ठिकाणी स्थलांतर करण्यात येत आहे. मागील चार वर्षांपासून स्थलांतराची प्रक्रिया सुरू आहे, परंतु विविध कारणांमुळे या प्रक्रियेला ग्रामस्थांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने सिडकोची डोकेदुखी वाढली आहे. स्थलांतर करणाºया ग्रामस्थांना सिडकोच्या वतीने भरीव पुनर्वसन पॅकेज देण्यात आले आहे, तसेच प्रोत्साहन भत्ताही दिला जात आहे. दहापैकी सहा गावांतील ग्रामस्थांकडून स्थलांतर प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु कोंबडभुजे, उलवे, तरघर आणि गणेशपुरी या चार गावांतील ग्रामस्थांनी आपल्या मागण्यांचा रेटा पुढे करीत स्थलांतराला विरोध दर्शविला होता. त्यानंतर सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी गावपातळीवर ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यानंतर स्थलांतरासाठी १५ जानेवारी ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्याला ग्रामस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गावांतील जुनी बांधकामे पाडून पुनर्वसन क्षेत्रात नवीन बांधकामे उभारली जात आहेत. १५ जानेवारीनंतर स्थलांतर करणाºयांना प्रोत्साहन भत्ता व इतर लाभ मिळणार नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी स्थलांतराची कार्यवाही गतिमान केली आहे.अनेक वेळा मुदतवाढविमानतळ प्रकल्पामुळे स्थलांतरित होणाºया ग्रामस्थांना १ मार्च २0१४ च्या शासन आदेशानुसार सर्वोत्तम पुनर्वसन व पुन:स्थापना पॅकेज दिले आहे. याअंतर्गत प्रकल्पबाधितांना १000 प्रति चौ.फूट बांधकाम अनुदान दिले जात आहे. दिलेल्या मुदतीत स्वत:हून बांधकामे पाडून स्थलांतरित करणाºया ग्रामस्थांना बांधकाम अनुदानाशिवाय प्रति चौ.फूट ५00 रुपये प्रोत्साहन भत्ता जाहीर करण्यात आला आहे. ही योजना २६ जानेवारी २0१८ रोजी जाहीर करण्यात आली. परंतु ग्रामस्थांच्या प्रतिसादाअभावी या मुदतीत वेळोवेळी वाढ करण्यात आली.आता १५ जानेवारी ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. 

टॅग्स :cidcoसिडकोNavi Mumbaiनवी मुंबई