शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

येलदरी जलविद्युत केंद्रात साडेपाच लाख युनिट विजेची विक्रमी निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 12:54 IST

आतापर्यंतच्या वीजनिर्मितीचा हा उच्चांक ठरला आहे.

ठळक मुद्दे३ कोटी रुपये ऊर्जा विभागातदररोज तीन संच चालवून विजेची निर्मिती करण्यात आली.

- प्रशांत मुळी 

येलदरी : ५ लाख ४० हजार युनिट प्रतिदिन वीजनिर्मितीची क्षमता असलेल्या येलदरी येथील जलविद्युत केंद्रातून १ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी ५ लाख ४५ हजार युनिट विजेची विक्रमी निर्मिती करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या वीजनिर्मितीचा हा उच्चांक ठरला आहे. विशेष म्हणजे यावर्षीच्या पावसाळी हंगामात या केंद्रातून झालेल्या वीजनिर्मितीतून सुमारे ३ कोटी १३ लाख ६८ हजार रुपयांची रक्कम ऊर्जा विभागाच्या तिजोरीत या केंद्राने जमा केली आहे.

येलदरी येथील ३३ टीएमसीच्या जलाशयावर ७.५ मेगा वॅट वीज निर्मिती करणाºया तीन संचांच्या साह्याने वीजनिर्मिती केली जाते. धरण भरल्याने वीजनिर्मिती केंद्रास चांगली कामगिरी करण्याची संधी प्राप्त झाली. येथील जलविद्युत केंद्राने अवघ्या २० दिवसांत १० दशलक्ष युनिट विजेची निर्मिती केली आहे. १ सप्टेंबर रोजी ५ लाख ४५ हजार युनिट विजेची निर्मिती करून या केंद्राने एका दिवसातील वीजनिर्मितीचा नवीन उच्चांक प्रस्थापित केला आहे. 

२० दिवसांत ११ लाख युनिटयेलदरी जलविद्युत केंद्रातून सोडलेल्या पाण्यावर दररोज तीन संच चालवून विजेची निर्मिती करण्यात आली. मागील २० दिवसांपासून तिन्ही संच पूर्ण क्षमतेने चालविले जात आहेत. याद्वारे ११ लाख ९ हजार युनिट विज निर्मिती करण्यात आली आहे. 

टॅग्स :Damधरणparabhaniपरभणीelectricityवीज