शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत हमीभाव केंद्रांकडे शेतकºयांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:29 IST

सोयाबीन उत्पादक शेतकºयांची बाजारपेठेत आर्थिक कोंडी होऊ नये, यासाठी राज्य शासनाने जिल्ह्यामध्ये ६ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले. परंतु, त्यामध्ये असलेल्या जाचक अटी, नियम व निकषांमुळे शेतकºयांनी या केंद्रांऐवजी खाजगी बाजारपेठेतच आपले सोयाबीन विक्री केले. दोन महिन्यात या केंद्रावर केवळ २ हजार ५ क्विंटल सोयाबीनचीच विक्री झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: सोयाबीन उत्पादक शेतकºयांची बाजारपेठेत आर्थिक कोंडी होऊ नये, यासाठी राज्य शासनाने जिल्ह्यामध्ये ६ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले. परंतु, त्यामध्ये असलेल्या जाचक अटी, नियम व निकषांमुळे शेतकºयांनी या केंद्रांऐवजी खाजगी बाजारपेठेतच आपले सोयाबीन विक्री केले. दोन महिन्यात या केंद्रावर केवळ २ हजार ५ क्विंटल सोयाबीनचीच विक्री झाली आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यामध्ये जवळपास २ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला होता. परंतु, जुलै, आॅगस्ट या दोन महिन्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाल्याचे दिसून आले. ज्या शेतकºयांनी उपलब्ध असलेल्या पाण्यावर सोयाबीन घेतले, त्यांना चांगले उत्पन्न झाले. मात्र गतवर्षी सारखी याहीवर्षी बाजारपेठेत सोयाबीन उत्पादकांची कोंडी होऊ नये, यासाठी राज्यशासनाने १० आॅक्टोबरपासून जिल्ह्यामध्ये पूर्णा, गंगाखेड, परभणी, मानवत, जिंतूर, सेलू या सहा ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले. या केंद्राच्या माध्यमातून ३ हजार ५० रुपये या हमीभाव दराने सोयाबीनची खरेदी केली जावू लागली. परंतु, नाफेडच्या निकष, अटी व नियमांनी सोयाबीन उत्पादक पुरता घायाळ झाला. हमीभाव केंद्राऐवजी खाजगी बाजारपेठेत आपले सोयाबीन विक्री करण्यास शेतकºयांनी पसंती दिली. जिल्ह्यातील ६ हमीभाव केंद्रावर दोन महिन्यांत केवळ २ हजार ५ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे.गंगाखेडात खरेदीच नाहीआॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील ६ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. या खरेदी केंद्रावर आतापर्यंत २ हजार ५ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे. यामध्ये परभणी येथील खरेदी केंद्रावर ५६५ क्विंटल ५० किलो, मानवत ५५३ क्विंटल, जिंतूर ३८५ क्विंटल, सेलू २६२, पूर्णा ४० क्विंटल तर गंगाखेड येथील हमीभाव खरेदी केंद्रावर आतापर्यंत एक किलोचीही खरेदी करण्यात आलेली नाही.