शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
4
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
5
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
6
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
7
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
8
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
9
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
10
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
11
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
12
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
13
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
14
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
15
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
16
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
17
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
18
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
19
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
20
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?

परभणी जिल्ह्यात ‘कृषी संजीवनी’ कडे शेतकºयांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 23:12 IST

कृषीपंपाच्या थकित विद्युत बिलावरील व्याज व दंड माफ करुन पाच टप्प्यात बिलाची रक्कम भरण्यासाठी महावितरणने कृषी संजीवनी योजना सुरु केली. परंतु, सेलू तालुक्यात १ हजार ४७५ शेतकºयांनीच २६ लाखांचा भरणा केला आहे. अजूनही जवळपास ९ हजार शेतकºयांनी या योजनेकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू/देवगावफाटा (परभणी): कृषीपंपाच्या थकित विद्युत बिलावरील व्याज व दंड माफ करुन पाच टप्प्यात बिलाची रक्कम भरण्यासाठी महावितरणने कृषी संजीवनी योजना सुरु केली. परंतु, सेलू तालुक्यात १ हजार ४७५ शेतकºयांनीच २६ लाखांचा भरणा केला आहे. अजूनही जवळपास ९ हजार शेतकºयांनी या योजनेकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येत आहे.सेलू तालुक्यामध्ये दुधना प्रकल्प आहे. शिवाय दुधना नदीपात्रातूनही सिंचनासाठी पाणी उपलब्ध होते. यामुळे तालुक्यात इतर तालुक्याच्या तुलनेमध्ये कृषीपंपधारक शेतकºयांची संख्या जास्त आहे. रब्बी हंगामातील पिकांसाठी सिंचन केले जाते. महावितरणच्या वतीने शेतकºयांना वीजपुरवठा उपलब्ध करुन दिला आहे. परंतु, मागील काही महिन्यांपासून पुरेशी वीज मिळत नाही. शेतकºयांकडे वीज बिलाची थकबाकी असल्याने सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणला कसरत करावी लागत आहे. तालुक्यामध्ये १० हजार ४०० कृषीपंपधारक आहेत. या कृषीपंपधारक शेतकºयांकडे ९० कोटी रुपयांची थकबाकी आहे. शेतकºयांकडील थकित बिल वसूल करण्यासाठी महावितरणने विविध पथकांची स्थापना केली होती. तसेच थकित बिलावरील व्याज व दंड माफ करुन पाच टप्प्यात बिलाची रक्कम भरुन थकबाकीमुक्त होण्यासाठी शासनाने कृषी संजीवनी योजना सुरु केली. ही योजना शेतकºयांसाठी चांगली असली तरी सेलू तालुक्यात मात्र म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. अनेक शेतकºयांकडे ३० ते ४० हजार रुपये थकित बिल असल्याने एकदम एवढे पैसे कसे भरायचे, असा प्रश्न निर्माण होत होता. एकूण थकबाकीपैकी पाच टप्प्यापैकी पहिला हप्ता भरणे आवश्यक होते. त्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार होता. परंतु, अनेक शेतकºयांनी याकडे पाठ फिरविली आहे.डिसेंबर अखेर सेलू तालुक्यातील १० हजार ४०० थकबाकीदार शेतकºयांपैकी केवळ १ हजार ४७५ शेतकºयांनी या योजनेचा लाभ घेतला. यातून २६ लाखांचा भरणा करण्यात आला. तर अजूनही जवळपास ८ हजार ९२५ शेतकºयांकडे वीज बिलाची थकबाकी आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत आहे. दुसरा हप्ता मार्च २०१८, तिसरा हप्ता जून २०१८, चौथा हप्ता सप्टेंबर २०१८ तर पाचवा हप्ता डिसेंबर २०१८ पर्यत आहे. त्यामुळे वीज बिल थकबाकीदार शेतकºयांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.शेतकरी सिंचनामध्ये व्यस्त४सेलू तालुक्यामध्ये दुधना नदीपात्रात पाणी सोडले आहे. यापूर्वी डाव्या व उजव्या कालव्यामध्ये पाणी सोडले होते. शेतकºयांनी पिकांना पाणी देणे सुरु केले असले तरी अजूनही अनेक ठिकाणी वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. रात्री-बेरात्री पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागत आहे. महावितरणने वीज पुरवठ्यातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करुन शेतकºयांना सुरळीत वीज पुरवठा करुन द्यावा, अशी मागणी शेतकºयांमधून केली जात आहे.मेश्राम यांनी घेतली बैठक४सेलू तालुक्यातील देवगावफाटा येथील ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत कृषीपंपाच्या थकबाकीचा आढावा सहाय्यक अभियंता आर.आर.मेश्राम यांनी २५ डिसेंबर रोजी घेतला. या बैठकीमध्ये कर्मचारी उपस्थित होते. तसेच देवगावफाटा ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत विविध समस्यांची बैठक घेत समस्या सोडविण्याच्या सूचना कर्मचाºयांना त्यांनी दिल्या.खंडीत विजेमुळे शेतकरी त्रस्त४महावितरणने कृषी संजीवनी योजना सुरू केली असली तरी कृषीपंपांना सुरळीत वीजपुरवठा केला जात आहे. सुमारे बारा तासांचे भारनियमन ग्रामीण भागात होत आहे. परिणामी पाणी उपलब्ध असतानाही ते पिकांना देता येत नसल्याने शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. महावितरणच्या या धोरणामुळे शेतकºयांत संताप आहे. त्यामुळेच कृषी संजीवनी योजनेकडे शेतकरी पाठ फिरवित असल्याचे चित्र आहे.कृषी संजीवनी योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत ३ हजार रुपये भरणे आवश्यक आहे. काही शेतकºयांनी दोन हजार रुपयांचा भरणा केला आहे. त्या शेतकºयांनी १ हजार रुपये रक्कम भरुन योजनेचा लाभ घ्यावा.-आर.आर.मेश्राम, सहाय्यक अभियंता