शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर परभणीत रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 14:07 IST

ओबीसींच्या प्रश्नांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील विविध ओबीसी संघटना तसेच सामाजिक संघटनांच्या वतीने ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्देओबीसींच्या महाज्योती या संशोधन प्रशिक्षण संस्थेसाठी १ हजार कोटी रुपयांची तरतूद करावीस्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी प्रवर्गाचे राजकीय आरक्षण कायम ठेवावे

परभणी : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी प्रवर्गाचे राजकीय आरक्षण कायम ठेवावे या प्रमुख मागणीसाठी २१ जून रोजी सकाळी ११ वाजता अ. भा. समता परिषदेच्या वतीने वसमत रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

ओबीसींच्या प्रश्नांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील विविध ओबीसी संघटना तसेच सामाजिक संघटनांच्या वतीने ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत सोमवारी परभणीत वसमत रोडवरील खानापूर फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. एक ते दीड तास केलेल्या या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

या आंदोलनात अ. भा. समता परिषदेचे चक्रधर उगले, नानासाहेब राऊत, एन. आय. काळे, अनिल गोरे, डॉ सुनील जाधव, राष्ट्रवादीचे प्रा. किरण सोनटक्के, नंदाताई राठोड, गोविंद यादव, अर्जुन वजीर, सुधाकरराव राठोड, कृष्णा कटारे, डॉ. विठ्ठल घुले यांच्यासह ओबीसींच्या विविध संघटनांचे कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले होते.

या मागण्यासाठी आंदोलनस्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी प्रवर्गाचे राजकीय आरक्षण कायम ठेवावे, सन २०१९ ची सार्वजनिक जनगणना केंद्र सरकार जातीनिहाय करणार नसेल तर महाराष्ट्र शासनातर्फे राज्यात जातीनिहाय जनगणना करावी, मराठा समाजाचे ओबीसीकरण करू नये, ओबीसींच्या महाज्योती या संशोधन प्रशिक्षण संस्थेसाठी १ हजार कोटी रुपयांची तरतूद करावी, आदी १९ मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या.

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलन