शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

देवदर्शनावरून परतणाऱ्या तरुणीवर बलात्कार; आरोपीस सात वर्षांचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 19:44 IST

नांदेड येथील पीडित युवती ८ ऑक्टोबर २०१५ रोजी पूर्णा तालुक्यातील गंगाजीबापु देवस्थान येथे दर्शनासाठी आली होती.

ठळक मुद्देपीडितेला पालम येथे स्वतःच्या घरी डांबून ठेवत तिच्यावर बलात्कार केला.

परभणी : पीडितेस घरात डांबून ठेवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीस परभणी येथील न्यायालयाने सात वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तिसरे सत्र न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांनी ३० एप्रिल रोजी हा निकाल दिला.

नांदेड येथील पीडित युवती ८ ऑक्टोबर २०१५ रोजी पूर्णा तालुक्यातील गंगाजीबापु देवस्थान येथे दर्शनासाठी आली होती. दर्शन घेऊन परत नांदेडला जात असताना आरोपी शेख शौकत शेख शरीफोद्दीन याने तिला धमकी देऊन बळजबरीने मोटारसायकलवर बसविले. पीडितेला पालम येथे स्वतःच्या घरी डांबून ठेवत तिच्यावर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी पालम पोलिसांनी पीडितेची सुटका केली होती. त्यानंतर पीडितेने पालम पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंद झाला होता.

तपासी अंमलदार ए. जी. कोलते, शेजवळ यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने ८ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी व वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. साक्षीपुराव्याअंती तिसरे सत्र न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांनी आरोपी शेख शौकत शेख शरीफोद्दीन यास दोषी ठरवत कलम ३७६ अन्वये सात वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड, कलम ३६६ अन्वये सात वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड, कलम ५०६ भादंवि अन्वये २ वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. तसेच दंडातील रकमेपैकी १० हजार रुपये पीडितेस आर्थिक साह्य म्हणून देण्याचे आदेश दिले. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी अभियोक्ता ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. मयूर साळापूरकर यांनी बाजू मांडली. त्यांना पैरवी अधिकारी एस. व्ही. मनाळे, टी. एस. राठोड व सूर्यवंशी यांनी मदत केली.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी