यासंदर्भात पीडित मुलीने जिंतूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पीडित मुलगी आणि जिंतूर येथील अनिल चांदू घनसावंत यांचे प्रेमसंबंध होते. त्यातूनच अनिल आणि त्याचा मित्र विष्णू घनसावंत यांच्या मदतीने मुलीला पळवून नेले. पीडित मुलीला सुरुवातीला पुणे आणि त्यानंतर नाशिक येथे नेले. त्या ठिकाणी अनिल आणि पीडित मुलगी नाशिक जिल्ह्यात साडेतीन महिने एकत्र राहिले. अनिलने लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी बलात्कार केला, अशी तक्रार पीडित मुलीने जिंतूर पोलिसांकडे दिली आहे. याप्रकरणी अनिल घवसावंत व विष्णू घनसावंत या दोघांविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक बी. बी. दडस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. पोलिसांनी आरोपी अनिल चांदू घनसावंत यास अटक केली आहे.
लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार ; दोघांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:16 IST