शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रामदास आठवले मृत सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना भेटले, काय शब्द दिला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 21:02 IST

शासन हे सूर्यवंशी कुटुंबीयांच्या पाठीशी असून त्यांना सर्वोतोपरी मदत केली जाईल, असा शब्द आठवले यांनी यावेळी दिला आहे.

Ramdas Athvale: केंद्रीय सामाजिक न्याय  व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज  दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी आणि आंबेडकरी चळवळीतील दिवंगत नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. दोन्ही कुटुंबांना शासनाच्यावतीने निश्चितपणे मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

रामदास आठवले यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांकडून त्यांची व्यथा जाणून घेतली. "परभणीत घडलेली घटना ही  दुर्दैवी आहे. या प्रकरणाची पारदर्शकपणे सखोल चौकशी व्हावी व दोषींवर कार्यवाई करण्यात यावी,  यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची  भेट घेणार आहोत. शासन हे सूर्यवंशी कुटुंबीयांच्या पाठीशी असून त्यांना सर्वोतोपरी मदत केली जाईल," असा शब्द आठवले यांनी यावेळी दिला आहे.  

आंबेडकरी चळवळीतील दिवंगत नेते विजय वाकोडे  यांच्या कुटुंबियांची त्यांच्या राहुलनगर स्थित घरी जाऊन रामदास आठवले यांनी सांत्वनपर भेट घेतली. समाजासाठी तळमळीने काम करणारा एक चांगला लोकनेता जिल्ह्याने गमावला आहे. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या स्मारकासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील, असे आठवले यांनी याप्रसंगी सांगितले. दरम्यान, शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत रामदास आठवले यांनी  जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी आणि अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांच्याकडून घटनेचा व याप्रकरणी केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी  दत्तु शेवाळे उपस्थित होते. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेParbhani Policeपरभणी पोलीस