शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

राजेश विटेकरांचे धाडस कामी आले, विधान परिषदेवर असताना विधानसभा लढले अन् जिंकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 13:29 IST

२०१९ ला राजेश विटेकर यांनी थेट लोकसभा लढविली पण पदरी अपयश, त्यानंतर पहिल्यांदा विधानसभा लढवत जिंकले

परभणी : विधान परिषदेवर निवडून येण्याला अवघ्या तीन महिन्यांचा काळ लोटला असतानाच आ. राजेश विटेकर यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढली अन् ती जिंकली. २०१९ला त्यांनी थेट लोकसभा लढविली होती. पदरी अपयश आल्याने यावेळी नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार करून त्यांनी विधानसभेचे मैदान मारले.

पाथरी हा मागील १५ वर्षांत कायम दोन आमदार राहणारा मतदारसंघ. एक विधानसभेवर तर दुसरा विधान परिषदेवर राहत आला. मोहन फड निवडून आले तेव्हा विधान परिषदेवर बाबाजानी दुर्राणी हे आधीपासूनच होते. तर सुरेश वरपूडकर हे विधानसभेवर असल्याच्या आधीच बाबाजानी विधान परिषदेवर होते. त्यामुळे या मतदारसंघात आता राजेश विटेकर हे विधान परिषदेवर गेल्याने पुन्हा दोन आमदारांची ही परंपरा मतदार कायम ठेवतील, अशी आवई उठली होती. विरोधकांनीही प्रचारात हाच मुद्दा ठेवत विटेकर निवडून आले तर पाथरीतील दोन आमदारांची परंपरा खंडित होण्याची भीती दाखविली होती.

विटेकर यांना २०१९ मध्ये लोकसभेला पराभव पत्करावा लागला. २०२४ मध्ये महादेव जानकर यांच्यासाठी त्याग करावा लागला. त्यामुळे विधानपरिषद मिळाली असली तरीही भविष्यात सुरक्षित मतदारसंघ तर हवा असल्याने त्यांनी ही निवडणूक लढविली.

धाडस कामी आलेआ. राजेश विटेकर यांच्या मातोश्री निर्मलाताई यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाने आधी उमेदवारी घोषित केली होती. मात्र, ऐनवेळी पक्षाने स्वत: विटेकर यांनाच मैदानात उतरवले. विटेकरांनी सहकाऱ्यांशी सल्लामसलत करून स्वत:चा अर्ज कायम ठेवला. हे धाडस कामी आले आणि ते विजयी झाले.

आता मिळाला हक्काचा मतदारसंघस्थानिक राजकीय तडजोडीत दिग्गज नेतेमंडळी आ. राजेश विटेकरांना संधी मिळू नये, यासाठी कायम आतून एकत्र यायचे. मात्र, वारंवार घडणाऱ्या या प्रकारावर मात करण्यासाठी त्यांना लोकसभेच्या भव्य मैदानात पकड जमविताना अडचणी यायच्या. पाथरी विधानसभेत मित्रपक्षाच्या छायेखाली राहावे लागत होते. अजित पवार गटात प्रवेश करत त्यांनी या सर्व अडचणी आधीच दूर केल्या. सुरेश वरपूडकर, बाबाजानी दुर्राणी या दोन माजी आमदारांसह माजी आमदार मोहन फड यांचे वडील मैदानात असताना त्यांनी बाजी मारली. आता त्यांना हक्काचा मतदारसंघ मिळाला आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024pathri-acपाथरी