शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात गंगाखेड, पाथरी परिसरात पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 23:46 IST

शनिवारी रात्री गंगाखेड आणि पाथरी परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली़ इतर तालुक्यांत मात्र दिवसभर ढगाळ वातावरण होते़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शनिवारी रात्री गंगाखेड आणि पाथरी परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली़ इतर तालुक्यांत मात्र दिवसभर ढगाळ वातावरण होते़जिल्ह्यात यावर्षी असमाधानकारक पाऊस झाला आहे़ मागील आठवड्यापासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे़ मात्र संपूर्ण आठवडाभरात पावसाने पाठ फिरविली़ जिल्ह्यात काही प्रमाणात थंडी वाढत आहे़ त्यातच शनिवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले़ परभणी शहर व परिसरात दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही़ वातावरणात उकाडा वाढला होता़ सायंकाळच्या सुमारास पावसाची भूरभूर झाली़ मात्र मोठा पाऊस झाला नाही़ गंगाखेड शहरामध्ये रात्री ८ वाजेच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली़ साधारणत: १० मिनिटे हा पाऊस झाला़ पाथरी शहर आणि परिसरातही रात्री ९़३० वाजेच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली तर जिंतूर तालुक्यातील येलदरी आणि परिसरात रात्री ९़४५ च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली आहे़ मध्यम स्वरुपाचा हा पाऊस होता़जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला़ मात्र प्रकल्पांमध्ये मोठा पाणीसाठा होईल, असा पाऊस झाला नाही़ विशेष म्हणजे जिल्ह्यात येलदरी आणि निम्न दूधना हे दोन मुख्य प्रकल्प आहेत़ या दोन्ही प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात असमाधानकारक पाऊस झाला आहे़ बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे येलदरी प्रकल्प कसाबसा मृतसाठ्यातून बाहेर पडला आहे़ मात्र या प्रकल्पातही समाधानकारक पाणीसाठा नाही़ सेलू तालुक्यातील निम्न दूधना प्रकल्पातही पाणीसाठा नसल्याने दोन्ही तालुक्यांबरोबरच या प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या गावांत पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊस