शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

परभणीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 00:19 IST

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न रखडल्याने या प्रश्नी आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी विधान परिषदेत तारांकीत प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधून घेतले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न रखडल्याने या प्रश्नी आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी विधान परिषदेत तारांकीत प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधून घेतले आहे़परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी विविध राजकीय पक्ष, नेते व जनतेने आंदोलन उभारल्यानंतर याची दखल घेऊन शासनाने भौतिक सुविधा व इतर बाबींच्या पाहणीसाठी त्रिस्तरीय समितीची नेमणूक केली होती़ त्यानंतर या प्रकरणी मंत्री मंडळाच्या बैठकीत घोषणा करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते़ त्यावर आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी तारांकीत प्रश्न उपस्थित करून त्यात सदर त्रिस्तरीय समितीने भौतिक सुविधा व इतर बाबींचा अहवाल शासनास सादर करण्याचे आदेश दिले होते का? असल्यास वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला का? वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेसंदर्भात कोणती कारवाई केली? आदी प्रश्न उपस्थित केले होते़ त्यावर आरोग्यमंत्री गिरीष महाजन यांनी तारांकीत प्रश्नाला उत्तर दिले आहे़ त्यात वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या २५ सप्टेंबर २०१८ रोजीच्या आदेशानुसार त्रिस्तरीय समिती गठीत केली होती़ या समितीने प्राथमिक अहवाल संचालनालयामार्फत शासनाला सादर केला असून, शासनस्तरावर कारवाई सुरू असल्याचे म्हटले आहे़ तर मंत्री मंडळ बैठकीत निर्णय अणि महाविद्यालयाच्या स्थापनेबाबत सुरू असलेल्या कारवाई संदर्भात विचारलेल्या प्रश्नांवर मंत्री मंडळ बैठकीत निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले़ त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न रखडला आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीMedicalवैद्यकीयStudentविद्यार्थीState Governmentराज्य सरकार