शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चंदन तस्करांची ‘पुष्पा’ गँग अडकली; मानवतमध्ये २६१ किलो चंदनासह १० तस्कर अटकेत

By मारोती जुंबडे | Updated: June 2, 2023 17:59 IST

वन विभाग, पोलीस प्रशासनाचे संयुक्त पथक सोनूला शिवारात माहिती मिळालेल्या ठिकाणी धडकले

मानवत: तालुक्यातील आंबेगाव व सोनूळा शिवारात चंदनाचे झाडे तोडून नेणाऱ्या १० चंदन तस्करांना वनविभाग व मानवत पोलीसच्या पथकाने १ जून रोजी सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेच्या दरम्यान संयुक्त कारवाई करून अटक केली. या चंदन तस्कराकडून अंदाजे २६१ किलो चंदन, ७ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

मानवत तालुक्यातील आंबेगाव, सोनूळा शिवारात गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एका नाल्यातील चंदनाची झाडे काही इसम तोडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ही माहिती पोलीस अधीक्षक आर. रागसुधा यांना देण्यात आली. त्यांनी वन विभागाला कळवून संयुक्त कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले. 

विभागीय वन आधिकारी अरविंद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आरएफओ ऋषिकेश चव्हाण, प्रकाश शिंदे, एस. के. भंडारे,सिमा राठोड, रेखा भेंडेकर, आश्विनी नागठाणे यांचे पथक दाखल झाल्यानंतर सपोनि आनंद बनसोडे, पोउनि किशोर गांवडे, अतुल पंचांगे, पोलीस शिपाई बाबासाहेब भांबट, चालक राजू इंगळे, सिद्धेश्वर पाळवदे, विलास मोरे यांच्या पथकाने आंबेगाव रस्त्यावर सापळा रचून माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा टाकला. यामध्ये १० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या चंदनाचे लाकुड, कुऱ्हाडी, दोन दुचाकी मिळुन आले. या चौघांची चौकशी केली असता त्यांचे साथीदार हे तालुक्यातील सोनूळा शिवारातील शेतकरी आसाराम भोरकडे यांच्या शेतातील आखाड्यावर असल्याची माहिती दिली. 

वन विभाग, पोलीस प्रशासनाचे संयुक्त पथक सोनूला शिवारात माहिती मिळालेल्या ठिकाणी धडकले असता या ठिकाणी चंदणाच्या झाडाच लगदा, कुऱ्हाडी, वाकस, विक्क, वजन काटे, तरा मापे, एक इलेक्ट्रीक काटा, दुचाकी मिळून आली. ही कारवाई ६ तास सुरु होती. वन विभागाच्या पथकाने पंचनामा करुन या दोन्ही ठिकाणच्या मिळून १० जणांना अटक केली असून वन विभागाकडे या आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणीSmugglingतस्करी