शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

रेकच्या अदलाबदलीने रेल्वेस विलंबाचे ग्रहण; पुणे-नांदेड एक्सप्रेस धावली पाच तास उशिरा

By राजन मगरुळकर | Updated: February 29, 2024 15:20 IST

आज नांदेड-पनवेल सुटणार तीन तास उशिरा

परभणी : दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागातून धावणाऱ्या नांदेड-पनवेल आणि नांदेड-पुणे या दोन रेल्वेचे रेक एकमेकांवर अवलंबून आहेत. त्यामुळे एक रेल्वे उशिराने धावली की दुसऱ्या रेल्वेला नांदेड येथून निघण्यास विलंब होतो. हा प्रकार नेहमीचा झाला आहे. त्यामुळे रेकच्या घोळामध्ये प्रवाशांना विलंबाच्या प्रवासाचा त्रास सहन करावा लागत आहे.

नांदेड-पनवेल रेल्वे परभणीमार्गे परळीकडून पुणे, पनवेल धावते तर नांदेड-पुणे रेल्वे परभणी येथून छत्रपती संभाजीनगर, मनमाडमार्गे पुण्यापर्यंत धावते. नांदेड-पुणे ही रेल्वे पुणे स्थानकावरून दिवसभर पुणे ते हरंगुळपर्यंत नेली जाते. त्यानंतर ती परत रात्री हरंगुळ-पुणे अशी आल्यावर पुणे येथून सोडली जाते. पुणे-नांदेड एक्स्प्रेस बुधवारी आणि गुरुवारी दोन दिवस किमान तीन ते पाच तास उशिराने धावली. गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास परभणीत रेल्वे दाखल झाली. त्यामुळे ही रेल्वे नांदेडला नियोजित वेळेपेक्षा सहा तास उशिराने आली. याच रेल्वेचा रेक सायंकाळी नांदेड-पनवेल म्हणून निघतो. 

आज नांदेड-पनवेल सुटणार तीन तास उशिरानांदेड-पनवेल रेल्वेचा नियोजित वेळ नांदेड येथून सुटण्याचा सहा वाजून वीस मिनिटांचा आहे. ही रेल्वे गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता नांदेड येथून सुटणार आहे. त्यामुळे पुढील प्रवासाला ही रेल्वे विलंबाने धावण्याची शक्यता आहे. दर आठवड्यामध्ये या प्रकाराचा नांदेड विभागातील नांदेड, परभणी, पूर्णा, परळी, लातूर  रोड मार्गावरील प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. यावर तोडगा काढावा, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीrailwayरेल्वे