शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

परभणीत शिवसेनेची जाहीर सभा : मेडिकल कॉलेज नव्या सरकारमध्ये सुरू करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 23:41 IST

परभणीकरांनी आत्तापर्यंत शिवसेनेच्या भगव्यावर भरभरून प्रेम केले आहे़ त्यामुळे जे वचन दिले आहे ते पूर्ण करणारच आहे़ जिल्ह्यात मंजूर झालेल्या जय भवानी सुतगिरणीला पूर्ण ताकद देणार असून, येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले असून, नवीन सरकार आल्यानंतर प्रत्यक्ष त्यास सुरुवात करणार असल्याचे आश्वासन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना दिले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणीकरांनी आत्तापर्यंत शिवसेनेच्या भगव्यावर भरभरून प्रेम केले आहे़ त्यामुळे जे वचन दिले आहे ते पूर्ण करणारच आहे़ जिल्ह्यात मंजूर झालेल्या जय भवानी सुतगिरणीला पूर्ण ताकद देणार असून, येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले असून, नवीन सरकार आल्यानंतर प्रत्यक्ष त्यास सुरुवात करणार असल्याचे आश्वासन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना दिले़परभणी विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार डॉ़ राहुल पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे बोलत होते़ यावेळी व्यासपीठावर खा़ बंडू जाधव, उमेदवार डॉ़ राहुल पाटील, माजी आ़ विजय गव्हाणे, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, शिवसेनेचे उपनेते विश्वनाथ नेरुरकर, जिल्हा सहसंपर्क प्रमुख डॉ़ विवेक नांवदर, आ. मोहन फड, गंगाप्रसाद आणेराव, डॉ़ सिद्धार्थ भालेराव, डी़एऩ दाभाडे, शिल्पा सरपोतदार, अंबिका डहाळे, सदाशिव देशमुख, नंदू आवचार, सुभाष जावळे आदींची उपस्थिती होती़ यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, प्रारंभापासूनच परभणी जिल्ह्याने शिवसेनेवर भरभरून प्रेम केले आहे़ परभणीकरांच्या धमण्यात भगवं रक्त वाहतं, त्यामुळे येथील जनतेची काळजी घेणं माझं कर्तव्य आहे़ मराठवाडा वॉटर ग्रीडमध्ये परभणी जिल्ह्याचा समावेश झाला नाही, हे समजलं; परंतु, या जिल्ह्याचा आपण समावेश करणार असा मी शब्द देतो़ जिल्ह्यातील जय भवानी महिला सहकारी सुतगिरणीला मंजुरी मिळून शासनाचा निधीही वर्ग झाला आहे़ या सुतगिरणीला आपण पूर्णपणे ताकद देणार आहे़ परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी मिळाली आहे़ नवीन सरकार आल्यानंतर त्यास सुरुवात करणार आहे़ परभणीतील साखर कारखान्याची मागणीही पूर्ण करायची असेल तर शिवसेना-भाजपाशिवाय समोर कोण आहे ? असा सवाल करून त्यांनी महायुती विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना खा़ बंडू जाधव यांनी परभणी जिल्ह्यात एकही मोठा उद्योग नाही़ त्यामुळे जिल्ह्यात चांगला उद्योग आणावा, अशी विनंती उद्धव ठाकरे यांच्याकडे केली़ यावेळी अरविंद देशमुख, संग्राम जामकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला़ यावेळी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले़ सूत्रसंचालन अभय कुलकर्णी यांनी केले़ या कार्यक्रमास नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती़मंत्रीऽ मंत्रीऽऽ मंत्री घोषणाबाजी४उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरू असताना उपस्थित जनसमुदायातून मंत्रीऽ मंत्री ऽऽ मंत्री अशा सातत्याने घोषणा देण्यात येत होत्या़ यावेळी भाषण थांबवून उद्धव ठाकरे म्हणाले की, आ़ डॉ़ राहुल पाटील यांना २०१४ मध्ये युती नसताना भरघोस मतांनी निवडून दिले़ आता आमची युती आहे़ त्यामुळे राहुलचं काय करायचं (मंत्री मंत्री घोषणेबाबत) ते मी पाहतो, समोरच्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त करून तिप्पट मतांनी राहुलला विजयी करा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले़बाजोरियांच्या उच्चारानंतर निष्क्रियतेचा घोष४यावेळी परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे आ़ विप्लव बाजोरिया व्यासपीठावर उपस्थित होते़ त्यांच्या नावाचा उच्चार व्यासपीठावर झाल्यानंतर समोरून निष्क्रिय आमदार अशा घोषणा काही कार्यकर्त्यांनी दिल्या़ बाजोरिया हे फक्त उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या वेळीच किंवा मोजक्या वेळीच परभणीत येतात़ इतर वेळी त्यांचा परभणीशी काहीही संबंध नसतो़ ते गायब असतात. त्यामुळे ते अत्यंत निष्क्रिय आहेत, असा संताप यावेळी उपस्थित तरुणांनी व्यक्त केला़साखर कारखाना मंजूर करा : राहुल पाटील४यावेळी राहुल पाटील म्हणाले, रोजगारयुक्त परभणी करण्याचा संकल्प केला असून, याचाच एक भाग म्हणून जय भवानी सहकारी सुतगिरणीला मंजुरी मिळाली़ यासाठी शासनाने ६ कोटींचा निधीही दिला आहे़ जवळपास ३ हजार लोकांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध होईल़ भविष्यात मतदार संघातील औद्योगिकीकरण वेगाने झाले पाहिजे, यासाठी परभणीत साखर कारखाना मंजूर करावा, अशी मागणी यावेळी डॉ़ पाटील यांनी केली़ २५० बचत गटांना राष्ट्रीयकृत बँकांमार्फत देण्यात येणाऱ्या कर्जापेक्षा १ टक्का कमी दराने कर्ज देवून महिलांची आर्थिक सक्षमता घडविण्याचा प्रयत्न केला़ या पुढेही मतदार संघात विकासाचे राजकारण करणार असून, जनतेने २०१४ मध्ये भरभरून प्रेम दिले़ यावेळेसही मतपेटीतून मोठ्या प्रमाणात आशिर्वाद द्यावेत, असे आवाहन यावेळी आ़ डॉ़ पाटील यांनी केले़

टॅग्स :parabhaniपरभणीAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरे