परभणी : तालुक्यातील सर्वच मंडळांत अतिवृष्टी झाल्याने पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ द्यावा, अशा सूचना आ. डॉ. राहुल पाटील यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी पीक विम्याच्या अनुषंगाने आढावा बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. परभणी तालुक्यातील सर्व मंडळांत अतिवृष्टी झाल्याने सर्वच शेतकऱ्यांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. तेव्हा सर्व शेतकऱ्यांना पीक विमा देण्याच्या सूचना आ. डॉ. पाटील यांनी केल्या. शहरात अतिवृष्टीने घरात पाणी शिरलेल्या सर्व भागांचे पंचनामे पूर्ण करावेत, पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक होत असून, त्वरित कर्ज वाटप करण्याच्या सूचना यावेळी बँक अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
बाधित शेतकऱ्यांना विम्याचा लाभ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:18 IST